Mehidy Hasan Miraz Dainik Gomantak
क्रीडा

IND vs BAN, 2nd ODI: बांगलादेशचा मिराज पुन्हा नडला! शतकासह केला 'हा' वर्ल्ड रेकॉर्ड

बांगलादेशच्या मेहदी हसन मिराजने भारताविरुद्ध दुसऱ्या वनडेत नाबाद शतकी खेळी केली आहे.

Pranali Kodre

ढाकामधील शेर बांगला नॅशनल स्टेडियमवर बांगलादेश विरुद्ध भारत यांच्यातील वनडे मालिकेतील दुसरा सामना झाला. या सामन्यात बांगलादेशचा अष्टपैलू मेहदी हसन मिराजने शतकी खेळी केली आहे. याबरोबरच त्याने एका विश्वविक्रमाची बरोबरीही केली आहे.

या सामन्यात बांगलादेश संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण बांगलादेशने नियमित अंतराने सुरुवातीच्या विकेट्स गमवल्या. एक परिस्थिती अशी होती की बांगलादेशने 69 धावांवर 6 विकेट्स गमावल्या होत्या. मात्र, नंतर महमुद्दुलाह आणि मेहदी हसन मिराजने 7 व्या विकेटसाठी तब्बल 148 धावांची भागीदारी रचली आणि बांगलादेशला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहचवले.

दरम्यान, महमुद्दुलाह 77 धावा करून बाद झाला. पण मेहदी हसनने त्याचा खेळ सुरू ठेवत शतक पूर्ण केले. त्याने डावाच्या शेवटच्या चेंडूवर एक धाव काढत त्याचे शतक पूर्ण केले. त्याने या सामन्यात 8 व्या क्रमांकावर फलंदाजीला येत 83 चेंडूत 8 चौकार आणि 4 षटकारांसह नाबाद 100 धावांची खेळी केली.

त्यामुळे तो वनडे क्रिकेटमध्ये 8 व्या क्रमांकावर फलंदाजी करताना शतक करणारा केवळ दुसराच क्रिकेटपटू ठरला आहे. यापूर्वी आयर्लंडच्या सिमी सिंगने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 16 जुलै 2021 रोजी 8व्या क्रमांकावर खेळताना शतक केले होते. यामुळे हा पराक्रम सिमी सिंग आणि मेहदी हसन या दोघांच्याच नावावर आहे.

भारताकडून चांगली गोलंदाजी, पण...

भारताने या सामन्यात चांगली गोलंदाजी केली होती. त्यांनी बांगलादेशच्या सुरुवातीच्या विकेट्स झटपट घेत त्यांना पिछाडीवर ढकलले होते. मात्र, अखेरच्या पाच षटकात भारताने धावांची खैरात वाटली. त्यामुळे बांगलादेशने 7 बाद 271 धावांची मजल मारली. यात महमुद्दुलाह आणि मेहदी हसनच्या भागीदारीचा मोठा वाटा राहिला.

रोहित शर्मा दुखापतग्रस्त

या सामन्यादरम्यान क्षेत्ररक्षण करताना भारताचा कर्णधार रोहित शर्माच्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याला स्कॅन करण्यासाठी हॉस्पिटलमध्येही जावे लागले. याचकारणामुळे तो भारताकडून सलामीला फलंदाजीसाठीही आला नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: रणजी क्रिकेटमध्ये गोव्याचा कर्णधार दर्शन मिसाळ चमकला

Goa Post Office: गोव्यात पोस्टाची सेवा ठप्प! देशभरातील इंटरनेट सेवेत बिघाड; बॅंकिंग सेवेला मोठा फटका

Bhutani Project: ‘त्‍या’ तिघांना अटक करा! सांकवाळच्या तीस महिलांसोबत कुतिन्हो यांची मागणी

Goa News: गोव्यात भूरूपांतरासाठी अनेक प्रस्ताव! 1 लाख 18 हजार 756 चौरस मीटर जमीनीवर लक्ष; 'नगर नियोजन'ने मागवले आक्षेप

Sattari Crime: वाळपईतील व्यावसायिकाला 'स्टॉक एक्स्चेंज'च्या व्याजाचे आमिष दाखवून एक कोटींचा गंडा! बंगळूरू येथील संशयितास अटक

SCROLL FOR NEXT