IND vs BAN, 2nd ODI: टीम इंडियाला धक्का! कर्णधार रोहित शर्मा करू शकणार नाही बॅटिंग?

बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत रोहित शर्मा बॅटिंग करणार की नाही, यावर प्रश्नचिन्ह आहे
Rohit Sharma
Rohit SharmaDainik Gomantak
Published on
Updated on

Rohit Sharma: बांगलादेश विरुद्ध भारत यांच्यात शेर बांगला नॅशनल क्रिकेट स्टेडियम , ढाका येथे वनडे मालिकेतील दुसरा सामना होतोय. दरम्यान, हा सामना सुरू असतानाच भारतीय संघाला मोठा धक्का बसला.

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या आंगठ्याला दुखापत झाली. त्यामुळे त्याला लगेचच हॉस्पिटलमध्ये स्कॅन करण्यासाठी पाठवण्यात आले आहे. याबद्दल बीसीसीआयने माहिती दिली आहे. त्यामुळे आता भारताच्या डावात त्याच्या फलंदाजीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

Rohit Sharma
IND vs ENG: रोहित शर्मा रडला! इंग्लंडकडून हरल्यानंतर टीम इंडिया झाली भावूक

रोहितला ही दुखापत सामना सुरू झाल्यानंतर लगेचच दुसऱ्या षटकादरम्यान झाली. झाले असे की प्रथम गोलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाकडून या षटकात मोहम्मद सिराज गोलंदाजी करत होता. त्यावेळी त्याने षटकातील चौथा चेंडू बांगलादेशचा सलामीवीर अनामुल हक विरुद्ध आऊटसाईड ऑफला टाकला. त्यावर अनामुलचा फटका मारण्याचा अंदाज चुकला.

त्यामुळे चेंडू त्याच्या बॅटच्या बाहेरच्या कडाला लागून स्लीपच्या दिशेने गेला. तिथे दुसऱ्या स्लीपमध्ये रोहित शर्मा क्षेत्ररक्षण करत होता. त्याने झेल घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, या प्रयत्नात त्याला दुखापत झाली आणि झेलही सुटला.

रोहितला जेव्हा चेंडू लागला तेव्हा त्याच्या हाताच्या अंगठ्याजवळून रक्त येताना दिसत होते. त्यामुळे लगेचच त्याला उपचारासाठी मैदानातून बाहेर जावे लागले. नंतर बीसीसीआयकडून माहिती देण्यात आली की त्याच्या अंगठ्याचे स्कॅन करावे लागणार आहे. त्यामुळे त्याच्या ऐवजी बदली क्षेत्ररक्षक म्हणून रजत पाटीदार मैदानावर आला आहे.

भारताला विजयाची गरज

दरम्यान, बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेत भारतीय संघ 0-1 फरकाने मागे आहे. बांगलादेशने पहिला सामना एका विकेटने जिंकून मालिकेत आघाडी घेतली आहे. त्यामुळे आता मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी भारतीय संघाला दुसरा सामना जिंकणे महत्त्वाचे आहे. जर दुसरा सामना भारताने गमावला, तर त्यांच्यावर मालिका पराभवाची नामुष्की ओढावेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com