MCC New Cricket Rules Bowled Out Change: क्रिकेटचा खेळ जितका लोकप्रिय आहे, तितकेच त्याचे नियमही खूप रंजक आहेत. खेळ आणखी सोपा आणि चांगला करण्यासाठी या नियमांमध्ये सतत बदल केले जातात. असाच एक मोठा बदल फलंदाज ‘बोल्ड’ होण्याच्या नियमाबाबत झाला. क्रिकेटचे नियम बनवणाऱ्या ‘मेरिलबोन क्रिकेट क्लब’ म्हणजेच एमसीसीने बोल्ड होण्याच्या नियमात एक सुधारणा केली. एमसीसीचे अध्यक्ष फ्रेजर स्टीवर्ट यांनी दिलेल्या माहितीनुसार, जर फलंदाजाने मारलेला चेंडू आधी नॉन-स्ट्रायकर एंडला असलेल्या स्टंप्सला लागला आणि तिथून चेंडू येऊन पुन्हा बॅटिंग एंडच्या स्टंप्सला लागून बेल्स पडल्या, तर आता फलंदाजाला 'बोल्ड' घोषित केले जाणार नाही.
दरम्यान, हा नियम बदलण्यामागे एक मजेशीर घटना घडली. एका सामन्यात फलंदाजाने मारलेला चेंडू थेट समोरच्या विकेट्सला लागला. तिथून तो चेंडू गोलंदाजाच्या बाजूकडून पुन्हा मागे आला आणि त्याने फलंदाजाच्या बाजूच्या विकेट्स पाडल्या. जुन्या नियमानुसार त्या फलंदाजाला आउट दिले गेले. मात्र, अशा प्रकारे आउट होणे खेळाडूवर अन्याय ठरेल असे वाटल्याने एमसीसीने हा नियम बदलला. आता नव्या नियमानुसार अशा प्रसंगात फलंदाज सुरक्षित राहील.
याशिवाय एमसीसीने 1 ऑक्टोबरपासून क्रिकेटचे इतरही काही सोपे नियम लागू केले. नवीन नियमांनुसार, जर फलंदाजाने पुढचा चेंडू खेळण्यासाठी उगाचच वेळ वाया घालवला, तर त्याला पहिल्या दोन वेळेस समज दिली जाईल. पण तिसऱ्यांदा असे केल्यास समोरच्या टीमला थेट 5 पेनल्टी रन्स मिळतील. तसेच दोन्ही टीमच्या कॅप्टनची संमती असल्यास दिवसा खेळल्या जाणाऱ्या साध्या टेस्ट मॅचमध्येही गुलाबी बॉल वापरता येईल. यासोबतच टेस्ट मॅचमध्ये दिवसाच्या शेवटच्या ओव्हरमध्ये एखादा खेळाडू आउट झाला, तर खेळ तिथेच संपणार नाही तर नवीन खेळाडूला मैदानात यावेच लागेल. हे सगळे नवीन नियम क्रिकेटचा (Cricket) खेळ अधिक रंजक बनवणार आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.