Hardik Pandya, Jasprit Bumrah, Mayank Agarwal,MS Dhoni,Rishabh Pant
Hardik Pandya, Jasprit Bumrah, Mayank Agarwal,MS Dhoni,Rishabh Pant Twitter
क्रीडा

रहस्य उलगडले! चार वर्षे जून्या फोटोत पंतच्या खांद्यावर हात कोणाचा? मयंक अगरवालचा खुलासा

Pranali Kodre

Mayank Agarwal revealed Whose hand on Rishabh Pant’s shoulder:

सोशल मीडियावर क्रिकेटपटूंचे अनेक फोटो व्हायरल होत असतात, असाच एक फोटो चार वर्षांपूर्वी व्हायरल झाला होता, ज्याबद्दल क्रिकेट चाहत्यांना पडलेल्या एका रहस्यमय प्रश्नाचे उत्तर मयंक अगरवालने दिले आहे.

इंग्लंड आणि वेल्समध्ये २०१९ वनडे वर्ल्डकप खेळवण्यात आला होता, त्यावेळी अष्टपैलू हार्दिक पंड्याने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत त्याला बॉईज डे आऊट असे कॅप्शन दिले होते. या फोटोमध्ये हार्दिक सेल्फी घेत असल्याचे दिसत आहे.

तसेच त्याच्याबरोबर एमएस धोनी, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह आणि मयंक अगरवाल दिसत आहेत. या फोटोंमध्ये खेळाडूंनी एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवलेला दिसत आहे.

मात्र, या फोटोत पंतच्या खांद्यावर ठेवलेला हात नक्की कोणाचा आहे, हा प्रश्न गेल्या चार वर्षांपासून क्रिकेट चाहत्यांना पडला होता.

अगदी गुरुवारी (२८ सप्टेंबर) एका चाहत्याने दिनेश कार्तिकला देखील याबद्दल प्रश्न विचारला होता. त्यावर कार्तिकने म्हटले होते की 'मलाही प्रश्न पडला असून आता त्याचे उत्तर पंतलाच विचारावे लागेल.'

यानंतर काहीवेळातच अखेर मयंक अगरवालने या रहस्याचा खुलासा करत त्या फोटोत पंतच्या खांद्यावर असलेला हात त्याचाच असल्याचे सष्ट केले. त्यामुळे अखेर चार वर्षांनी चाहत्यांना तो हात मयंकचा असल्याचे समजले आहे.

या रहस्याबद्दल खुलासा करताना मयंकने लिहिले की 'अनेक वर्षांच्या रिसर्चनंतर,चर्चेनंतर आणि अनेक सिद्धांतांनंतर देशाला अखेर हे सांगायला हवे की तो पंतच्या खांद्यावरील हात माझा आहे. या व्यतिरिक्त जे कोणतेही दावे करण्यात आहे, ते सर्व खोटे आहेत.'

मयंकच्या या पोस्टनंतर मात्र क्रिकेट चाहत्यांच्या अनेक मजेशीर प्रतिक्रिया आल्या आहेत. मयंकला २०१९ वर्ल्डकपसाठी दुखापतग्रस्त विजय शंकरच्या जागेवर भारतीय संघात संधी मिळाली होती.

मात्र, त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळाली नव्हती. त्या वर्ल्डकप स्पर्धेत भारताला उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्ध १९ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता, त्यामुळे तिसरे वर्ल्डकप विजयाचे स्वप्न तुटले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Todays Live Update: कर्नाटकाने म्हादईचे पाणी वळवण्यासाठी केलेल्या कामांची पाहणी होणार: CM सावंत

Futsal Goa: गोव्याच्या आंबेली स्पोर्टस क्लबचा गतविजेत्यांना मिनर्व्हा अकादमीला धक्का, उपांत्य फेरीत प्रवेश

Goa 2075 देशातील पहिली लाईव्ह कादंबरी; अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या पाच व्यक्तींची कथा

FDA Raid At Mapusa: म्हापसामध्ये अन्न आणि औषध प्रशानसनाची मोठी कारवाई; 500 किलो पनीर जप्त

Ozari Waterfall Trek: GTDC चे रविवारी वजीर धबधब्यावर ट्रेकिंग; कसा असणार प्रवास आणि फी जाणून घ्या

SCROLL FOR NEXT