New Zealand Captain Kane Williamson will miss World Cup 2023 opener match in Ahmedabad against England:
भारतात 5 ऑक्टोबरपासून वनडे वर्ल्डकप स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड संघात खेळवला जाणार आहे. पण या सामन्यापूर्वीच न्यूझीलंडला मोठा धक्का बसला आहे.
न्यूझीलंडचा नियमित वनडे कर्णधार केन विलियम्सन इंग्लंडविरुद्ध 5 ऑक्टोबरला होणारा सलामीचा सामना खेळणार नाही.
विलियम्सनला आयपीएल 2023 स्पर्धा खेळताना गुडघ्याला दुखापत झाली होती, ज्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली.
त्यातून विलियम्सन सावरला असून वर्ल्डकप स्पर्धा खेळण्यासाठी आता सज्ज आहे. मात्र, सुरुवातीलाच त्याच्याबाबत कोणतीही जोखिम घेण्यास न्यूझीलंड संघव्यवस्थान तयार नाही, त्यामुळे पहिल्या सामन्यात त्याला न खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की वर्ल्डकप 2023 मधील मोहिम सुरु करण्यापूर्वी न्यूझीलंड पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्या विरुद्ध सराव सामना होणार आहे. यातील 29 सप्टेंबरला होणाऱ्या पाकिस्तानविरुद्धच्या सराव सामन्यात तो केवळ फलंदाज म्हणून खेळेल, तर 2 ऑक्टोबर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तो फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणही करताना दिसू शकतो.
विलियम्सनच्या अनुपस्थितीत यष्टीरक्षक फलंदाज टॉम लॅथम न्यूझीलंड संघाचे नेतृत्व करेल.
न्यूझीलंड 2015 आणि 2019 असे सलग दोन वर्ल्डकपमध्ये उपविजेते राहिले आहेत. त्यामुळे यंदा विजेतेपद मिळवण्याचा त्यांचा हेतू असेल.
वर्ल्डकप 2023 साठी न्यूझीलंड संघ - केन विलियम्सन (कर्णधार), ट्रेंट बोल्ट, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम, डॅरिल मिशेल, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, ईश सोधी, टिम साऊथी, विल यंग.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.