Glenn Maxwell - Matthew Wade ANI
क्रीडा

IND vs AUS T20i: 'जर 30 धावा दिल्या नसत्या, तर शतकही झालं नसतं', जेव्हा कर्णधारच उडवतो मॅक्सवेलची थट्टा

Glenn Maxwell Century: भारताविरुद्ध गुवाहाटीत झालेल्या टी20 सामन्यात मॅक्सवेलने केलेल्या शतकाबद्दल ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मॅथ्यू वेडने भन्नाट प्रतिक्रिया दिली आहे.

Pranali Kodre

Matthew Wade on Glenn Maxwell Century during India vs Austalia 3rd T20I: ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने मंगळवारी (28 नोव्हेंबर) भारताविरुद्ध झालेल्या टी20 मालिकेतील तिसऱ्या सामन्यात 5 विकेट्सने विजय मिळवला.

या विजयासह ऑस्ट्रेलियाने मालिकेतील आव्हान राखले आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या विजयानंतर कर्णधार मॅथ्यू वेडने आनंद व्यक्त करताना गमतीशीर भाष्यही केले.

या सामन्यात भारताने दिलेल्या 223 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाकडून ग्लेन मॅक्सवेलने 48 चेंडूत 8 चौकार आणि 8 षटकारांसह नाबाद 104 धावा केल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने अखेरच्या चेंडूवर भारताने दिलेले लक्ष्य यशस्वी पूर्ण केले. अखेरच्या षटकात ऑस्ट्रेलियाला 21 धावांची गरज होती. त्यावेळी वेडने 5 आणि मॅक्सवेलने 18 धावा चोपल्या.

याच सामन्यात भारतीय संघ प्रथम फलंदाजी करत असताना ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज केन रिचर्डसन दुखापतग्रस्त झाल्याने वेडला अखेरच्या षटकात ग्लेन मॅक्सवेलला गोलंदाजी द्यावी लागली.

मॅक्सवेलने गोलंदाजी केलेल्या या षटकात तब्बल 30 धावा निघाल्या. दरम्यान, याचबद्दल वेडने सामन्यानंतर मजेशीर भाष्य करत मॅक्सवेलची थट्टा केली.

वेड म्हणाला, 'यापेक्षा चांगसा विजय काय असू शकेल. हे मेहनतीचे फळ आहे. केनला दुखापत झाल्याने अखेरच्या षटकात मॅक्सवेलला गोलंदाजी द्यावी लागली. पण त्याने फलंदाजी शानदार केली. त्याने 100 व्या टी20 सामन्यात शतक केले.

'मी असं म्हणणार नाही की माझ्यात खूप आत्मविश्वास होता, मी अर्ध्यामार्गापर्यंत थोडा साशंक होतो. 19 व्या षटकापर्यंत त्यांनी 190 धावाच केल्या होत्या, तोपर्यंत आम्ही सामन्यात आहोत असे वाटले होते, पण शेवटच्या षटकात 30 धावा निघाल्या.'

'रिचर्डसनला दुखापत झाली, त्यामुळे मला शेवटच्या षटकासाठी एक गोलंदाज कमी पडत होता. पण शेवटी सर्व मजेशीर झाले, मॅक्सवेलने जर त्या शेवटच्या षटकात ३० धावा दिल्या नसल्या, तर मॅक्सवेल कदाचीत शतक करू शकला नसता. आशा आहे की आम्ही अजून एक विजय मिळवून शेवटचा सामना निर्णयक ठरवू.'

दरम्यान, या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून मॅथ्यू वेड 16 चेंडूत 28 धावांवर नाबाद राहिला. त्याने मॅक्सवेलबरोबर 91 धावांची नाबाद भागीदारी केली.

तत्पुर्वी भारताकडून ऋतुराज गायकवाडनेही शतकी खेळी केली. त्याने  57 चेंडूत 123 धावांची नाबाद खेळी केली. या खेळीत त्याने 13 चौकार आणि 7 षटकार मारले. त्यामुळे भारताने 20 षटकात 3 बाद 222 धावा उभारल्या होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shubman Gill Century: शुभमन गिलचा धमाका! ठोकलं बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

Camel Tear: उंटाचे अश्रू सापाच्या विषावर गुणकारी, एक थेंब 26 सापांच्या विषावर ठरेल जालीम औषध; अभ्यासातून स्पष्ट

CO2 To Alcohol: विज्ञानाचा चमत्कार! कार्बनचे अल्कोहोलमध्ये रुपांतर करण्यात कोरियाच्या वैज्ञानिकांना यश

Anaya Bangar: 'पुरुषाच्या देहात एक कोमल स्त्री जगत होती'; अनाया बांगरने जागवल्या लिंगबदल काळातील नाजूक आठवणी

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

SCROLL FOR NEXT