IND vs AUS: मॅक्सवेलनं मारलं गुवाहाटीचं मैदान! शतकासह केली रोहित शर्माच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी

Glenn Maxwell Century: गुवाहाटीत भारताविरुद्ध झालेल्या टी20 सामन्यात ग्लेन मॅक्सवेलने ताबडतोड शतक करताना विक्रमांचे मनोरे रचले.
Glenn Maxwell
Glenn MaxwellICC
Published on
Updated on

India vs Australia 3rd T20I Match at Guwahati, Glenn Maxwell Century:

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात मंगळवारी 5 सामन्यांच्या टी20 मालिकेतील तिसरा सामना पार पडला. गुवाहाटीतील बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने अखेरच्या चेंडूवर 5 विकेट्सने विजय मिळवला. ग्लेन मॅक्सवेल ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा हिरो ठरला.

भारताने दिलेल्या 223 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मॅक्सवेलने 48 चेंडूत 8 चौकार आणि 8 षटकारांसह नाबाद 104 धावा केल्या. त्याने 47 चेंडूतच त्याचे शतक पूर्ण केले होते. त्यामुळे त्याने अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे.

रोहित शर्माची बरोबरी

मॅक्सवेलचे हे आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधील चौथे शतक होते. त्यामुळे त्याने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत पहिल्या क्रमांकावरील रोहित शर्माची बरोबरी केली आहे. रोहितने देखील 4 आंतरराष्ट्रीय टी20 शतके केली आहेत.

रोहित आणि मॅक्सवेल यांच्यापाठोपाठ बाबर आझम, सबावून डाविझी, कॉनिल मुन्रो आणि सूर्यकुमार यादव हे खेळाडू आहेत. या चौघांनीही प्रत्येकी 3 आंतरराष्ट्रीय टी20 शतके केली आहेत.

Glenn Maxwell
'मृत्युशय्येवर असेल, तरी विराटची विकेट...', कमिन्सची World Cup फायनलबाबत पुन्हा एकदा मोठी प्रतिक्रिया

दरम्यान, मॅक्सवेलने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये धावांचा यशस्वी पाठलाग करताना तिसरे शतक केले आहे. त्यामुळे हा पराक्रम करणारा पहिलाच खेळाडू ठरला आहे.

त्याने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये धावांचा यशस्वी पाठलाग करताना सर्वाधिक शतके करणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत बाबर आझम आणि मुहम्मद वासिमला मागे टाकले आहे. त्यांनी धावांचा यशस्वी पाठलाग करताना प्रत्येकी 2 आंतरराष्ट्रीय टी20 शतके केली आहेत.

ऑस्ट्रेलियासाठी वेगवान शतक

मॅक्सवेल हा ऑस्ट्रेलियाचा आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वात कमी चेंडूत शतक करणारा फलंदाजही ठरला आहे. याबाबत त्याने ऍरॉन फिंच आणि जोश इंग्लिसची बरोबरी केली आहे.

फिंचने 2013 साली इंग्लंडविरुद्ध टी20 सामन्यात साऊथॅम्पटनला 47 चेंडूत शतक केले होते, तर जोश इंग्लिसने सध्या सुरु असलेल्या टी20 मालिकेतील पहिल्याच सामन्यात विशाखापट्टणमला 47 चेंडूत शतक ठोकले होते.

  • आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वात कमी चेंडूत शतक ठोकणारे ऑस्ट्रेलियन फलंदाज

    • 47 चेंडू - ऍरॉन फिंच (वि. इंग्लंड, साऊथॅम्पटन, 2013)

    • 47 चेंडू - जोश इंग्लिस (वि. भारत, विशाखापट्टणम, 2023)

    • 47 चेंडू - ग्लेन मॅक्सवेल (वि. भारत, गुवाहाटी, 2023)

    • 49 चेंडू - ग्लेन मॅक्सवेल (वि. श्रीलंका, पाल्लेकेले, 2016)

    • 50 चेंडू - ग्लेन मॅक्सवेल (वि. भारत, बंगळुरू, 2019)

Glenn Maxwell
Maxwell Double Century: जबरदस्त! 21 फोर, 10 सिक्स अन् डबल सेंच्यूरी, मॅक्सवेलने रचले विक्रमांचे मनोरे

ऑस्ट्रेलियाने जिंकला सामना

ऑस्ट्रेलियाने मॅक्सवेलच्या शतकाच्या जोरावर 20 षटकात 5 विकेट्स गमावत 225 धावांसह भारताने दिलेले 223 धावांचे आव्हान पूर्ण केले. ऑस्ट्रेलियाकडून मॅक्सवेल व्यतिक्त फलंदाजांची छोटेखानी खेळी केल्या.

सलामीला ट्रेविस हेडने 18 चेंडूत 35 धावा केल्या. तर ऍरॉन हार्डिने 16, इंग्लिसने 10 आणि मार्कस स्टॉयनिसने 17 धावांची खेळी केली, तसेच अखेरीस मॅक्सवेलला कर्णधार मॅथ्यू वेडने 16 चेंडूत नाबाद 28 धावा करत चांगली साथ दिली. भारताकडून रवी बिश्नोईने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या.

तत्पुर्वी, प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाकडून ऋतुराज गायकवाडनेही शतकी खेळी केली. त्याने 57 चेंडूत 123 धावांची नाबाद खेळी केली. या खेळीत त्याने 13 चौकार आणि 7 षटकार मारले.

याशिवाय कर्णधार सूर्यकुमार यादवने 39 धावांची आणि तिलक वर्माने 31 धावांची खेळी केली. त्यामुळे भारताने 20 षटकात 3 बाद 222 धावा उभारल्या.ऑस्ट्रेलियाकडून ऍरॉन हार्डी, केन रिचर्डसन आणि जेसन बेऱ्हेनडॉर्फ यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com