Manchester City Dainik Gomantak
क्रीडा

मँचेस्टर सिटीचा ऐतिहासिक विजय! पहिल्यांदाच कोरले UEFA Champions League जेतेपदावर नाव

मँचेस्टर सिटीने UEFA चॅम्पियन्स लीगचे विजेतेपद मिळवले आहे.

Pranali Kodre

Manchester City clinched UEFA Champions League: रविवारी 68 व्या UEFA चॅम्पियन्स लीगचा अंतिम सामन्यात मँचेस्टर सिटीने इंटर मिलनविरुद्ध विजय मिळवत इतिहास रचला आहे. मँचेस्टर सिटीने 1-0 अशा गोलफरकाने विजय मिळवत चॅम्पियन्स लीग ट्रॉफीवर नाव कोरले आहे.

इस्तांबुलमधील अतातुर्क ऑलिम्पिक स्टेडियममध्ये झालेल्या या अंतिम सामन्यात विजय मिळवल्याने मँचेस्टर सिटीने पहिल्यांदाच चॅम्पियन्स लीग ट्रॉफी जिंकली आहे.

या सामन्यात मँचेस्टर सिटीकडून एकमेव गोल रॉड्रिगोने केला. दरम्यान इंटर मिलानने मँचेस्टर सिटीला संपूर्ण सामन्यात तगडी लढत दिली. दोन्ही संघांकडून चांगले आक्रमण आणि बचाव पाहायला मिळाला.

पण असे असतानाही 68 मिनिटाला रोड्रिगोने इंटर मिलानचा बचाव भेदला आणि पहिला गोल नोंदवला. त्यानंतरही दोन्ही संघांना शेवटपर्यंत गोल करता आला नाही. त्यामुळे अखेर मँचेस्टर सिटीने विजेतेपदावर नाव कोरले.

या सामन्यानंतर मँचेस्टर सिटीचे मॅनेजर पेप गार्डिओला म्हणाले, 'कधीकधी यावर्षीच्या स्पर्धेकडे पाहिले की वाटते की अंतिम सामना हा नशीबातच होता.' तसेच त्यांनी गोलरक्षक एडरसनचेही कौतुक केले आहे.

पेप गार्डिओला हे दोन वेगवेगळ्या संघांबरोबर चॅम्पियन्स लीग जिंकणारे पहिले मॅनेजर ठरले आहेत. यापूर्वी बार्सिलोनाबरोबर त्यांनी 2008-09 मध्ये आणि आता मँचेस्टर सिटीबरोबर 2022-23 साली विजेतेपद जिंकले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: मंगळ करणार 'त्रिगुणी संचार'!! सुरु होणार धन, सुख आणि समृद्धीचा प्रवाह; 3 राशींना मिळणार फायदा

Canacona: रायींमध्ये देवत्व लाभलेला, दूधसागरकडे जाताना लक्ष वेधून घेणारा 'मधुवृक्ष जर्माल'

Cluster University Goa: एकेकाळी 'गोवा युनिव्हर्सिटी'ला केंद्रीय दर्जा देण्याची चर्चा चालली होती; क्लस्टर विद्यापीठांची संकल्पना

Goa Live News: कुडचडे पोलिस स्टेशनजवळ झालेल्या अपघातात स्कूटर चालक जखमी

Narve: नार्वेच्या पंचगंगेच्या तीरावर भरली ‘अष्टमीची’ जत्रा; भरपावसातही भक्तीचा उत्साह

SCROLL FOR NEXT