IPL Auction 2023
IPL Auction 2023 Dainik Gomantak
क्रीडा

IPL ला मिळणार चौथा लिलावकर्ता! कोण सांभाळणार जबाबदारी, जाणून घ्या

Pranali Kodre

Auctioneer for IPL 2024 Players Auction:

इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेसाठी संघ बांधणी करण्याची संधी फ्रँचायझींना लवकरच मिळणार आहे. आयपीएलच्या 17 व्या हंगामाचा लिलाव येत्या 19 डिसेंबर 2023 रोजी दुबईमध्ये पार पडणार आहे. या लिलावासाठी लिलावकर्ता कोण असणार याबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता असेल.

दरम्यान, यंदा आयपीएलच्या लिलावात लिलावकर्ता म्हणून मलिका सागर भूमिका निभावणार आहे. त्यामुळे आयपीएलला चौथा लिलावकर्ता मिळाला आहे. तसेच पहिल्यांदाच महिला लिलावकर्ता आयपीएलमध्ये दिसणार आहे.

क्रिकबझच्या रिपोर्टनुसार बीसीसीआयने फ्रँचायझींना माहिती दिली आहे की मलिका सागर या लिलावाचे संचालन करेल आणि तीच या लिलावात मध्यस्थ असेल.

मलिकाने यापूर्वी वूमन्स प्रीमियर लीगच्या (WPL) दोन्ही हंगामाच्या लिलावात लिलावकर्ता म्हणून काम पाहिले आहे. तसेच 2021 पासून तिने प्रो कबड्डीचा लिलावही सांभाळला आहे. तिला लिलावकर्ता म्हणून जवळपास 25 वर्षांचा अनुभव आहे.

यापूर्वी आयपीएलच्या लिलावात लिलावकर्ता म्हणून ह्यू एडमीड्स यांनी गेले 5 हंगाम काम केले होते. त्यांनी 2019 पासून ही जबाबदारी सांभाळली होती. पण 2022 मध्ये ते लिलावादरम्यानच बेशुद्ध झाले होते. त्यावेळी उर्वरित लिलाव चारु शर्मा यांनी लिलावकर्ता म्हणून सांभाळला होता.

यानंतर आयपीएल 2023 च्या लिलावात एडमीड्स यांनीच ही जबाबदारी सांभाळली. त्याचबरोबर 2008 ते 2018 दरम्यान 10 वर्षे रिचर्ड मॅडली यांनी ही जबाबदारी सांभाळली होती.

पहिल्यांदाच परदेशात होणार लिलाव

दरम्यान, आयपीएलचा लिलाव पहिल्यांदाच भारताबाहेर होणार आहे. यापूर्वी झालेल्या सर्व 16 हंगामांचे लिलाव भारतात झाले होते. पण आता 17 व्या हंगामाचा लिलाव दुबईमधील कोका-कोला एरिनामध्ये होणार असून या लिलावाला भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 1.00 वाजता सुरुवात होणार आहे.

या लिलावासाठी बीसीसीआयने 333 खेळाडूंची निवड केली आहे. या 333 खेळाडूंमध्ये 214 भारतीय खेळाडू, 119 परदेशी खेळाडू आहेत. तसेच 10 संघांमध्ये केवळ 77 खेळाडूंसाठी जागा शिल्लक आहे. त्यामुळे 333 खेळाडूंपैकी केवळ 77 खेळाडूंनाच बोली लागू शकते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT