IPL 2024: धोनीच्या CSK मध्ये रायुडूची जागा घेऊ शकतो टीम इंडियाचा त्रिशतकवीर, अश्विनने बांधले अंदाज

R Ashwin: चेन्नई सुपर किंग्स संघात अंबाती रायुडूच्या जागेवर कोणाला संधी मिळू शकते, याबद्दल आर अश्विनने अंदाज व्यक्त केला आहे.
Ambati Rayudu Announces Retirement From IPL
Ambati Rayudu Announces Retirement From IPLX
Published on
Updated on

R Ashwin predict options for CSK for Ambati Rayudu's replacement in IPL 2024 Auction:

इंडियन प्रीमयर लीग 2024 हंगामासाठी खेळाडूंच्या लिलाव 19 डिसेंबर 2023 रोजी दुबईमध्ये पार पडणार आहे. या लिलावासाठी आता संघांची तयारी सुरु झाली आहे.

याचदरम्यान अनेकजण कोणता संघ कोणत्या खेळाडूवर बोली लावू शकतो, याचे अंदाज बांधत आहेत. भारताचा फिरकीपटू आर अश्विनने देखील चेन्नई सुपर किंग्स संघाबाबत अंबाती रायुडूच्या बदली खेळाडूबाबत भाष्य केले आहे.

चेन्नईने यंदा करारमुक्त केलेल्या खेळाडूंमध्ये अंबाती रायुडूचेही नाव आहे. रायुडूने आयपीएल 2023 स्पर्धेनंतर निवृत्तीची घोषणा केली होती. त्यामुळे त्याला करारमुक्त करावे लागले. आता त्याचा बदली खेळाडू शोधण्याचे आव्हान चेन्नई समोर असणार आहे. याबद्दल बोलताना आर अश्विनने शाहरुख खान आणि करूण नायर यांची नावे घेत अंदाज बांधले आहेत.

Ambati Rayudu Announces Retirement From IPL
IPL 2024: धोनी पुन्हा मैदानात दिसणार! CSK ने 17 व्या हंगामासाठी कॅप्टनकूलला केलं संघात कायम

2008 ते 2015 दरम्यान चेन्नईकडून खेळलेला अश्विन त्याच्या युट्यूब चॅनेलवर बोलताना म्हणाला, 'मला वाटते की चेन्नई करुण नायरमध्ये गुंतवणूक करू शकतात. ते अंबाती रायुडूचा बदली खेळाडू शोधत असतील. शाहरुख त्याच्यासाठी चौथ्या क्रमांकाचा बदली खेळाडू नाही, पण मला कल्पना नाही की ते त्या जागेवर या हंगामात कोणाला खेळवणार आहेत.'

'ते त्या जागेवर कदाचीत डावखुरा खेळाडू खेळवू शकतात. पण जर सीएसकेचा ट्रॅक रेकॉर्ड पाहिला, तर ते कधीही अनोळखी खेळाडूसाठी जात नाहीत. चेन्नई संघाने अशा खेळाडूला कधी संघात सामील केलेले नाही, ज्यांनी सय्यद मुश्ताक अली टी20 ट्रॉफीच्या पहिल्याच हंगामात चांगला खेळ केला आहे. ज्यामुळे करुण नायर चेन्नईसाठी खेळताना दिसू शकतो.'

नायरने चेन्नईमध्ये कसोटीत त्रिशतक केल्याचीही आठवण करून दिली. त्याने म्हटले की 'करुण नायरने असा खेळाडू आहे, जो फिरकी गोलंदाजी चांगली खेळू शकतो, तो स्वीप आणि रिव्हर्स स्वीप चांगला खेळतो.'

'एमएस धोनीला अस खेळाडू आवडेल, जो वरच्या आणि मधल्या फळीच्या मधे चौथ्या क्रमांकावर खेळू शकतो, विशेषत: चेन्नईमध्ये. मला वाटते करूण नायर त्यासाठी योग्य आहे. मी चेन्नईमध्ये मनिष पांडेला फार फिरकी गोलंदाजी खेळताना पाहिलेले नाही, पण करूण नायर, लक्षात ठेवा त्याने चेन्नईत कसोटी सामना खेळताना त्रिशतक केले होते.'

Ambati Rayudu Announces Retirement From IPL
IPL 2024 Auction: तारीख अन् ठिकाण ठरलं! 'या' दिवशी दुबईत रंगणार लिलाव, BCCI ची घोषणा

करुण नायरने चेन्नईत 2016 साली इंग्लंडविरुद्ध कसोटी सामन्यात 303 धावांची खेळी केली होती. त्यावेळी तो भारताकडून कसोटीत त्रिशतक करणारा विरेंद्र सेहवागनंतरचा दुसराच खेळाडू ठरला होता. दरम्यान, करुणला गेल्या तीन हंगामात आयपीएलमध्ये फारशी संधी मिळालेली नाही.

अश्विन पुढे असेही म्हणाला की करुणसाठी सनरायझर्स हैदराबादही प्रयत्न करू शकतात. त्यामुळे त्याला यावेळी चांगली किंमत मिळू शकते. त्याने काऊंटी क्रिकेटमध्येही सध्या चांगली कामगिरी केली आहे.

तो म्हणाला, 'त्याच्यासाठी गेली काही वर्ष संघर्षमय राहिली आहेत. तुम्ही कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक करता आणि अचानक तुम्हाला संघर्ष करावा लागतो, हे सोपे नाही. हे सर्व स्विकारणे एखाद्या व्यक्तीसाठी कठीण असते, पण करुणने यातूनही झुंज दिली, त्याबद्दल त्याचे कौतुक आहे. त्याने कर्नाटत प्रीमियर लीगमध्येही चांगला खेळ केला, त्याच्यासाठी पुढे चांगल्या गोष्टी दिसत आहेत.'

दरम्यान, करुण नायरने आयपीएलमध्ये आत्तापर्यंत 76 सामने खेळले असून 23.75 च्या सरासरीने 1496 धावा केल्या आहेत. यामध्ये 10 अर्धशतकांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com