India Hockey Team Dainik Gomantak
क्रीडा

Asian Champions Trophy Hockey: भारताला चौथ्यांदा विजेतेपदाची संधी! मलेशियाविरुद्ध रंगणार फायनलचा थरार

Malaysia vs India Final: आशिया चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 स्पर्धेत भारत आणि मलेशिया संघात शनिवारी फायनल रंगणार आहे.

Pranali Kodre

Asian Champions Trophy Hockey 2023, Malaysia vs India, Final match: आशिया चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 स्पर्धेचा 12 ऑगस्ट म्हणजेच आज अंतिम दिवस आहे. आज भारत आणि मलेशिया हॉकी संघांमध्ये अंतिम सामना रंगणार आहे. चेन्नईमधील मेयर राधाकृष्णन हॉकी स्टेडियमवर रात्री 8.30 वाजता हा सामना रंगेल.

भारतीय संघाने जपानला उपांत्य फेरीत 5-0 गोलफरकाने पराभूत करत पाचव्यांदा अंतिम सामना गाठला आहे. भारताने आत्तापर्यंत तीनवेळा ही स्पर्धा जिंकली आहे. आत्तापर्यंत भारताने 2011, 2016 आणि 2018 या तीन वर्षी विजेतेपदाला गवसणी घातली आहे. त्यामुळे आता आज चौथ्यांदा या स्पर्धच्या विजेतेपदावर नाव कोरण्याची संधी भारताला असणार आहे.

तसेच मलेशियाने कोरियाला उपांत्य सामन्यात 6-2 गोलफरकाने पराभूत करत अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. त्यामुळे भारत आणि मलेशिया यांच्यात किताबी लढत होईल.

भारतीय संघ यावर्षीच्या आशिया चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत आत्तापर्यंत अपराजित राहिला आहे. भारताने साखळी फेरीत 4 विजय आणि 1 बरोबरीसह गुणतालिकेत अव्वल क्रमांकावर राहत उपांत्य फेरीत प्रवेश केला होता.

तसेच मलेशियाने साखळी फेरीत 4 विजय आणि 1 पराभवासह गुणतालिकेत भारतापाठोपाठ दुसरा क्रमांक मिळवत उपांत्य फेरी गाठली होती.

साखळी फेरीत भारत आणि मलेशिया यांच्यात लढत झाली होती. या सामन्यात भारताने मलेशियाचा 5-0 असा धुव्वा उडवला होता.

आत्तापर्यंत भारत आणि मलेशिया यांच्यात झालेल्या सामन्यांपैकी भारताने 23 सामने जिंकले आहेत. तसेच मलेशियाने 7 सामने जिंकले आहेत. याशिवाय 4 सामने बरोबरीत सुटले आहेत.

दरम्यान, आज होणारा भारत विरुद्ध मलेशिया यांच्यातील अंतिम सामना चाहते स्टार स्पोर्ट्सच्या चॅनेलवर पाहू शकतात. तसेच फॅन कोड ऍप आणि वेबसाईटवरही या सामन्याचे लाईव्ह स्ट्रिंमिंगवर पाहू शकतात.

तिसऱ्या आणि चौथ्या स्थानासाठीही सामना

दरम्यान, आज उपांत्य फेरीत पराभूत झालेले जपान आणि कोरिया या हॉकी संघात तिसऱ्या आणि चौथ्या स्थानासाठी सामना रंगणार आहे.

हा सामना अंतिम सामन्यापूर्वी चेन्नईतच भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 6 वाजता सुरू होईल. या सामन्यात विजय मिळवणारा संघ तिसरा क्रमांक मिळवेल, तर पराभूत होणारा संघ पाचव्या क्रमांकावर राहिल.

पाकिस्तान पाचव्या क्रमांकावर

दरम्यान, 11 ऑगस्टला पाकिस्तान आणि चीन यांच्यात पाचव्या आणि सहाव्या क्रमांकासाठी सामना झाला होता. या सामन्यात पाकिस्तानने चीनला 6-1 गोलफरकाने पराभूत करत पाचवे स्थान निश्चित केले. तसेच पराभवामुळे चीनला सर्वात शेवटचे म्हणजेच 6 व्या स्थानावर राहावे लागले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier Exposition: वाजत गाजत निघाली गोंयचो सायबाची मिरवणूक; पहिल्या सोहळ्याचे खास Video पाहा

Goa Government: गोवा सरकारचा मोठा निर्णय; अपघातग्रस्तांना 10 लाखापर्यंत मिळणार नुकसान भरपाई

Sunburn Festival: हा सूर्य हा जाळ

IFFI मध्ये Goan Director's Cut चे आकर्षण! सगळ्या गोमंतकीय सिनेमांची माहिती घ्या एका क्लिकमध्ये

Goa Today's News Live: कुंकळ्ळीतील 100 घरांवर पडणार हातोडा! हायकोर्टाचा आदेश

SCROLL FOR NEXT