MS Dhoni, Sanju Samson Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2026: संजू सॅमसन घेणार 'धोनी'ची जागा? दिग्गज क्रिकेटपटूच्या वक्तव्यामुळे रंगली चर्चा; उपकर्णधारपदाचे वर्तवले भाकीत

MS Dhoni IPL : ४४ वर्षीय महेंद्रसिंग धोनी येत्या २८ तारखेपासून सुरू होणाऱ्या आयपीएलमध्ये खेळण्यास सज्ज होत आहे. गेल्या काही आयपीएलपासून धोनी तळाच्या क्रमांकावर फलंदाजी करीत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Chennai Super Kings vice captain prediction : येत्या आयपीएलमध्ये महेंद्रसिंग धोनीने सहा क्रमांकाच्या आतच फलंदाजी करावी. आठव्या किंवा नवव्या क्रमांकावर आल्यावर त्याचे अस्तित्व कसे दिसून येणार, असा प्रश्न दक्षिण आफ्रिकेचे माजी दिग्गज फलंदाज एबी डिव्हिलियर्स यांनी उपस्थित केला आहे.

४४ वर्षीय महेंद्रसिंग धोनी येत्या २८ तारखेपासून सुरू होणाऱ्या आयपीएलमध्ये खेळण्यास सज्ज होत आहे. गेल्या काही आयपीएलपासून धोनी तळाच्या क्रमांकावर फलंदाजी करीत आहे. यंदा त्याने असे करू नये, असे डिव्हिलियर्स यांनी सुचवले आहे.

चेन्नई संघाने धोनीच्या नावावर आयपीएलमध्ये आपले साम्राज्य उभे केले आहे. त्यामुळे चेन्नईचा संघ जेव्हा जेव्हा मैदानात उतरतो तेव्हा धोनी हा घटक त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. चेन्नई सुपर किंग्ज असा उल्लेख केला जातो तेव्हा लगेचच धोनी हे नाव पुढे येते, असे डिव्हिलियर्स यांनी म्हटले आहे.

गेल्या काही वर्षांचा आढावा घेतला तर धोनीच्या नावावर चेन्नईचा ब्रँड कायम ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण धोनी गेल्या मोसमाप्रमाणे यंदाही आठव्या किंवा नवव्या क्रमांकावर फलंदाजीस आला तर फार काही साध्य होणार नाही, तसेच कर्णधारही नसल्याने धोनीचे अस्तित्व जाणवणार नाही, असे डिव्हिलियर्सनी सांगितले.

यंदाची परिस्थिती धोनीसाठी कदाचित आणखी वेगळी असू शकते. कारण टी-२० विश्वकरंडक स्पर्धा गाजवणारा संजू सॅमसन चेन्नई संघात आला आहे. त्यामुळे सुरुवातीच्या काही सामन्यांत तरी सॅमसम केंद्रस्थानी राहणार आहे. यष्टीरक्षण सॅमसन करणार की धोनी, हा प्रश्नही महत्त्वाचा ठरणार आहे, असे डिव्हिलियर्स यांचे म्हणणे आहे.

संजू सॅमसनला राजस्थान रॉयल्स संघातून आपल्या संघात रवींद्र जडेजाच्या मोबदल्यात ट्रेड करताना चेन्नई व्यवस्थापनाने मोठा विचार केला आहे. त्याचा नेतृत्वाच्या ग्रुपमध्ये समावेश केला जाईल, असे मत अनिल कुंबळे यांनी मांडले आहे.

कुंबळे यांच्या मते, बॅटन पास करण्याचा हा प्रकार आहे. धोनीच्या पश्चात चेन्नई संघाला उत्तम यष्टीरक्षक आणि तेवढ्याच भरवशाच्या फलंदाजाची गरज लागणार आहे.

म्हणूनच सॅमसनला त्यांनी आपल्या संघात घेतले आहे. विश्वकरंडक स्पर्धेत महत्त्वाच्या सलग तीन सामन्यांत निर्णायक फलंदाजी करून सॅमसनने आपली उपयुक्तता

आणि क्षमता दाखवून दिली आहे. सॅमसन हा मूळचा केरळातील असला तरी तो तमिळ भाषा उत्तम बोलतो. परिणामी तो चेन्नई संघाशी लगेचच एकरूप होऊ शकतो, असे कुंबळे यांनी सांगितले.

सॅमसनकडे उपकर्णधारपद?

सॅमसनकडे उपकर्णधारपद दिले जाण्याची शक्यता कुंबळे यांनी व्यक्त केली. आयपीएलमध्ये नेतृत्व करण्याचा सॅमसनकडे चांगला अनुभव आहे. अनेक वर्षे त्याने राजस्थान रॉयल्स संघाचे कर्णधारपद सांभाळले आहे. त्यामुळे चेन्नईसाठी तो भविष्यातील कर्णधारही असू शकतो, असे कुंबळे म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाच्या चर्चेदरम्यान मोदी सरकारचा मोठा निर्णय, 'या' सरकारी कर्मचाऱ्यांची लागली लॉटरी; ओल्ड पेन्शन स्कीमचा मिळणार फायदा

Horoscope 20 May 2026: चंद्राचे गोचर घडवणार चमत्कार! बुधवारचा दिवस 5 राशींसाठी भाग्याचा; व्यवसायातून होणार अफाट धनलाभ

Goa ABVP: बिट्स पिलानीमधील आत्महत्यांची सीबीआयकडून चौकशी व्हावी; अभाविप, तर न्यायासाठी तीव्र आंदोलन उभारणार

Goa Monsoon Preparations: डिचोली परिसरात मजुरांचा वाढलाय 'भाव'; पावसाळापूर्व कामांची गडबड, अवकाळी पावसामुळे कामात व्यत्यय

Goa Politics: फोंडा मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलणार; भाटीकरांच्या कार्यकर्त्यांच्या भूमिकेवर लक्ष, इच्छुकांची संख्या वाढण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT