महाराष्ट्राच्या (Maharashtra) किशोर संघाने गोव्याचा (Goa) 31-06 असा धुव्वा उडवित एक डाव आणि 25 गुणांनी सामना आपल्या नावावर केला. Dainik Gomantak
क्रीडा

राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राचा गोव्यावर शानदार विजय

या सामन्यात गोव्याला (Goa) महाराष्ट्राचा (Maharashtra) एकही गडी प्रत्यक्ष बाद करता आला नाही. महाराष्ट्राच्या प्रशिक्षकांनी आपल्या खेळाडूंना जास्त ताण न देता. सर्व संरक्षकांना काही आंतराने निवृत्त होण्यास सांगितले.

Sanket Kulkarni

महाराष्ट्राच्या (Maharashtra) किशोर संघाने 31 साव्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत (31st National Championship Kho-Kho Competition) गोव्याचा (Goa) दणदणीत पराभव करीत शानदार विजय मिळविला आहे. महाराष्ट्राच्या किशोर संघाने गोव्याचा 31-06 असा धुव्वा उडवित एक डाव आणि 25 गुणांनी सामना आपल्या नावावर केला.

या सामन्यात गोव्याला महाराष्ट्राचा एकही गडी प्रत्यक्ष बाद करता आला नाही. महाराष्ट्राच्या प्रशिक्षकांनी आपल्या खेळाडूंना जास्त ताण न देता. सर्व संरक्षकांना काही आंतराने निवृत्त होण्यास सांगितले. त्यामुळेच गोव्याला त्याचे 6 गुण मिळाले. महाराष्ट्राच्या पहिल्या डावात, राज जाधव (3:40 मि. संरक्षण करत, 1 गडी) तर अथर्व पाटील (नाबाद 2:00 मि. संरक्षण 1 गडी), दुसऱ्या डावात ईशांत वाघ (3:30 मि. संरक्षण 4 गडी), मोहन चव्हाण (1:50 मि. सरंक्षण,3 गडी) हा निवृत्त झाल्याने गोव्याला गुण मिळाले. आक्रमणात महाराष्ट्राने हाराद्या वसावेने 6 गडी तर कर्णधार सोत्या वळवी व जिशान मुलाणीने प्रत्येकी 5-5 गडी बाद केले. गोव्याकडून देवांश आणि रजत यांनी काहीप्रमाणात लढत देण्याचा प्रयत्न केला.

दुसऱ्या सामन्यात कोल्हापूरच्या संघाने हिमाचल प्रदेशचा 21-05 असा एक डाव 16 गुणांनी पराभव केला. तर कर्नाटकच्या संघाने बिहारचा 29-04 असा एक डाव 25 गुणांनी पराभव केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Punav Utsav: ‘देवाच्या पुनवे’ला उसळली गर्दी! देवी सातेरी, भगवतीचा उत्सव; आगरवाडा, पार्सेवासीय भक्तीत दंग

Goa Live News Updates: चलो बुलावा आया है! काँग्रेस हायकमांडकडून गोव्यातील नेत्यांना दिल्लीत येण्याचे आदेश

Purple Fest: पर्पल फेस्टसाठी गोवा सज्ज! 15 हजारांहून अधिक प्रतिनिधींचा सहभाग; मंत्री फळदेसाईंनी दिली माहिती

Panaji: इस्रायली कारवायांविरोधात आंदोलन! पणजीत 60 नागरिकांवर कारवाई; परवानगी नसल्याने पोलिसांनी रोखले

Goa Mining: खाण खाते खटल्यांच्या जंजाळात! 130 प्रकरणे सुरु; खाणी सुरू करताना अडथळ्यांची शर्यत

SCROLL FOR NEXT