पणजी: गोव्याचे (Goa) 19 वर्षांखालील क्रिकेटपटू सुमारे दीड वर्षांनंतर चार दिवसीय सामन्यांची स्पर्धा खेळण्यासाठी मैदानावर उतरत आहेत. कुचबिहार करंडक क्रिकेट स्पर्धेच्या (Kuchbihar Trophy Cricket Tournament) एलिट क गटात त्यांना प्रत्येक लढतीत कठीण परीक्षा द्यावी लागण्याचे संकेत आहेत.
गुजरातमधील सूरत (Surat) येथे महिनाभराच्या कालावधीत गोव्याचा संघ पाच सामने खेळेल. पहिला सामना सोमवारपासून महाराष्ट्राविरुद्ध खेळला जाईल. त्यानंतर 6 डिसेंबरपासून तमिळनाडूविरुद्ध, 13 डिसेंबरपासून हिमाचलविरुद्ध, 20 डिसेंबरपासून छत्तीसगडविरुद्ध, तर 27 डिसेंबरपासून मध्य प्रदेशविरुद्ध सामना होईल.
कोरोना विषाणू (Covid 19) महामारीमुळे ज्युनियर क्रिकेटपटूंसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ 2020-21 मोसमात एकही स्पर्धा घेऊ शकले नाही. त्यापूर्वी गोव्याचा संघ 2019-20 मोसमातील कुचबिहार करंडक स्पर्धेत प्लेट गटात खेळला होता. या वर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये गोव्याचा 19 वर्षांखालील संघ विनू मांकड करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत खेळला. पाचपैकी एका लढतीत गोव्याने विजय नोंदविला, दोन लढतीत पराभव पत्करावा लागला, तर दोन लढतींचा पावसाचा फटका बसला.
'आमचे खेळाडू अंदाजे दीड वर्षांत एकही सामना खेळले नाहीत. त्यांची तंदुरूस्ती पातळी खूपच खालावली आहे. काही खेळाडू १६ वर्षांखालील वयोमर्यादा ओलांडल्यानंतर दीर्घ कालावधीत स्पर्धा न खेळता थेट १९ वर्षांखालील संघात आले आहेत. या खेळाडूंसाठी कौशल्य आणि तंदुरुस्तीच्या पातळीवर हा बदल खूपच खडतर ठरू शकतो. संघर्षमय कालखंड असला, तरी खेळाडूंनी मेहनतीस प्राधान्य दिले ही कौतुकास्पद बाब आहे,' असे सूरतला रवाना होण्यापूर्वी गोव्याचे मुख्य प्रशिक्षक राजेश कामत यांनी सांगितले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.