LSG New Logo Dainik Gomantak
क्रीडा

LSG New Logo: लखनऊ सुपर जायंट्सचा 'नवा अवतार'! आयपीएल 2026 पूर्वी लोगोमध्ये मोठा बदल; पाहा PHOTO

LSG Official Logo: इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२६ चा हंगाम सुरू होण्यापूर्वीच मैदानाबाहेर मोठा बदल पाहायला मिळाला आहे.

Sameer Amunekar

लखनऊ: इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२६ चा हंगाम सुरू होण्यापूर्वीच मैदानाबाहेर मोठा बदल पाहायला मिळाला आहे. लखनऊ सुपर जायंट्स (LSG) या संघाने आपल्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून जुना लोगो हटवला असून, संघ आता एका पूर्णपणे नवीन ओळखीसह मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाला आहे. या 'रीब्रँडिंग'मुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली असून, लखनऊचा नवा लोगो कसा असेल, याबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे.

फ्रेन्चायझीकडून चाहत्यांची फिरकी

२०२६ च्या सुरुवातीला चाहत्यांच्या लक्षात आले की, लखनऊ सुपर जायंट्सच्या इंस्टाग्राम, ट्विटर आणि अधिकृत वेबसाईटवरून त्यांचा जुना लोगो अचानक नाहीसा झाला आहे. इतकेच नाही तर, संघाने एक गुढ व्हिडिओ शेअर करत चाहत्यांनाच विचारले की, "अचानक आमचा लोगो कुठे गेला?" या हटके प्रमोशनमुळे सोशल मीडियावर 'LSG New Logo' ट्रेंड होऊ लागला आहे. २०२२ मध्ये पदार्पण करताना वापरलेला निळा आणि नारंगी रंगाचा 'पंख' असलेला लोगो आता इतिहासजमा होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

नव्या लोगोमध्ये 'हत्ती'ची एन्ट्री?

मिळालेल्या माहितीनुसार, नवीन लोगो हा जुन्या पंखांच्या संरचनेवर आधारित असला तरी, त्यात आता एक 'हत्ती' (Elephant Face) जोडण्यात आला असल्याची शक्यता आहे. हत्ती हे शक्ती आणि वैभवाचे प्रतीक मानले जाते, त्यामुळे लखनऊचा हा नवा अवतार अधिक आक्रमक आणि भव्य असणार आहे.

ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली आणि मुख्य प्रशिक्षक जॅस्टिन लँगर यांच्या मार्गदर्शनाखाली हा संघ एका 'नव्या उर्जे'सह मैदानात उतरण्यास सज्ज झाला आहे. गेल्या हंगामातील निराशाजनक कामगिरी विसरून हा नवीन लोगो संघासाठी 'नवे पर्व' घेऊन येईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली तगडा संघ

लखनऊ सुपर जायंट्सने आयपीएल २०२६ साठी अत्यंत संतुलित संघ तयार केला आहे. ऋषभ पंतसह निकोलस पूरन, मिचेल मार्श आणि एडन मार्कराम यांसारख्या स्फोटक फलंदाजांची फळी संघात आहे. तसेच मोहम्मद शमी, अनरिच नॉर्टजे आणि मयंक यादव यांसारख्या वेगवान गोलंदाजांच्या जोरावर संघ जेतेपदावर नाव कोरण्यासाठी सज्ज आहे. विशेष म्हणजे अर्जुन तेंडुलकरलाही या संघात स्थान मिळाले असून, या 'रिब्रँड' केलेल्या संघाकडून चाहत्यांना मोठ्या अपेक्षा आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope April 2026: 30 एप्रिलपर्यंत 'नो रिस्क'! ग्रहांची बदलली चाल, मेष राशीचं वाढलं टेन्शन; चुकीच्या निर्णयामुळे अडकू शकता संकटाच्या चक्रव्यूहात

GCA Premier League: धेंपो क्लबची अर्धी मोहीम फत्ते, 'चौगुले'विरुद्ध 646 धावांचा डोंगर; स्नेहलचे द्विशतक, जीवनचे शतक

VIDEO: वैमानिकाची एक चूक अन् 8 प्रवाशांचा खेळ खल्लास, 5 मिनिटांतच होत्याचं नव्हतं झालं; इंडोनेशियातील बोर्नियो बेटावर हेलिकॉप्टर क्रॅश

Watch Video: अय्यरच्या 'सुपरमॅन' अवतारावर रोहित-सूर्याचे विस्फारले डोळे, चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला; श्रेयसचा धडाकेबाज कॅच व्हायरल

Omkar Elephant: 'ओंकार'चा उगवे भागात धुमाकूळ, संतप्त नागरिकांकडून सरकारविरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा

SCROLL FOR NEXT