Viresh Borkar, CM Sawant
Viresh Borkar, CM SawantDainik Gomantak

Goa Politics: 'वीरेश बोरकरना पोलिसांनी का हटवले'? CM सावंतांनी दिले उत्तर; लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याबाबत केले आवाहन

Viresh Borkar protest: लोकशाही मार्गाने आंदोलन करावे आणि आपल्‍या मागण्‍या योग्‍य त्‍या व्‍यासपीठांवरून सरकारसमोर ठेवाव्‍यात, असे आवाहनही मुख्‍यमंत्र्यांनी केले.
Published on

पणजी : एखाद्या खात्‍याच्‍या कार्यालयात दिवसरात्र बसून आंदोलन छेडणे पूर्णपणे चुकीचे आहे. आंदोलनावेळी तेथील फाईल्‍स गहाळ झाल्‍यास जबाबदार कोण? आमदार वीरेश बोरकर यांनी टीसीप‍ी कार्यालयात आंदोलन सुरू केले तेव्‍हा मामलेदार आणि पोलिसांनी त्‍यांना समजावण्‍याचा प्रयत्‍न केला. परंतु ते ऐकले नाहीत. ‘मला उचलून न्‍या’ असे त्‍यांनी स्‍वत:च सांगितले.

त्‍यामुळेच संयम बाळगलेल्‍या पोलिसांना त्‍यांना तेथून हटवावे लागले, असे मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. विरोधी पक्षनेते तसेच लोकप्रतिनिधींना आंदोलकांसोबत एखाद्या मंत्र्याच्‍या घरासमोर जाऊन आंदोलन करणे शोभत नाही. राज्‍यातील कायदा आणि सुव्‍यवस्‍था अबाधित राखण्‍यासाठी त्‍यांनी लोकशाही मार्गाने आंदोलन करावे आणि आपल्‍या मागण्‍या योग्‍य त्‍या व्‍यासपीठांवरून सरकारसमोर ठेवाव्‍यात, असे आवाहनही मुख्‍यमंत्र्यांनी केले.

नगरनियोजन कायद्यातील (टीसीपी) कलम ‘३९-अ’ रद्द करण्‍याची मागणी करत आमदार वीरेश बोरकर यांनी पणजीतील आझाद मैदानावर आंदोलन छेडले आहे. या आंदोलनाला पाठिंबा देत विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, ‘आप’चे आमदार व्‍हेंझी व्‍हिएगस, क्रुझ सिल्‍वा यांनी सोमवारच्‍या महाआंदोलनात उपस्‍थित लावली.

Viresh Borkar, CM Sawant
Maha Andolan: आझाद मैदानावर शेकडो नागरिक एकवटले! 39 A विरोधात महाआंदोलन; पोलिसांचा कडेकोट पहारा

तसेच सरकार आपल्‍या मागण्‍या ऐकत नसल्‍याचे लक्षात येताच त्‍यांनी थेट नगरनियोजनमंत्री विश्‍‍वजीत राणे यांच्‍या दोनापावला येथील निवासस्‍थानावर आंदोलकांसह मोर्चा काढला. या मार्गावर पोलिसांनी आंदोलकांना विविध ठिकाणी रोखण्‍याचा प्रयत्‍न केला. परंतु, संतप्‍त आंदोलक मागे हटण्‍यास तयार झाले नाहीत. त्‍यामुळे राजधानी पणजीतील वातावरण ढवळून निघाले.

Viresh Borkar, CM Sawant
'करो या मरो' महाआंदोलनाची हाक, पणजीत '39-ए' विरोधात लढा; विरोधकांकडून जनतेला सहभागाचे आवाहन

काय म्‍हणाले मुख्‍यमंत्री?

आपल्‍या मागण्‍यांसाठी आंदोलन करण्‍याचा प्रत्‍येकाला अधिकार आहे. परंतु आंदोलन लोकशाही मार्गाने झाली पाहिजे.

आंदोलकांना सरकारने अडवले नाही. त्‍यांना आझाद मैदान दिलेले आहे. त्‍यांनी तेथे बसून आंदोलन करावे. मर्यादांचे उल्लंघन करू नये.

विरोधी पक्षनेत्‍यांना कायदे माहीत असतात. एखाद्या मंत्र्याच्‍या घरासमोर जाऊन आंदोलन करणे आणि कायदा हाती घेणे त्‍यांना आणि इतर लोकप्रतिनिधींना शोभत नाही.

कलम ‘३९-अ’ला विरोध करणाऱ्या आंदोलकांना चर्चा करण्‍यासाठी अनेक व्‍यासपीठे आहेत. त्‍यांनी याबाबत जिल्‍हाधिकाऱ्यांना निवेदन द्यावे किंवा न्‍यायालयात आव्‍हान द्यावे.

लोकांना भडकावून आणि आंदोलने करून कायदा हाती घेतल्‍यास त्‍यास विरोधी पक्षनेते, लोकप्रतिनिधींसह आंदोलकही जबाबदार राहतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com