LSG  Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: पंजाबविरुद्ध 56 धावांनी विजय मिळवूनही लखनऊला धक्का! मॅच विनर खेळाडूच झाला जखमी

लखनऊ सुपर जायंट्सचा स्टार ऑलराऊंडर पंजाब किंग्सविरुद्ध खेळताना दुखापतग्रस्त झाला आहे.

Pranali Kodre

Marcus Stoinis Finger Injury: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत शुक्रवारी पंजाब किंग्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स संघात सामना पार पडला. मोहालीत झालेल्या सामन्यात लखनऊने 56 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात मार्कस स्टॉयनिसने लखनऊला विजय मिळवून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला. मात्र, या सामन्यात त्याला दुखापत झाली आहे.

या सामन्यात लखनऊने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 बाद 257 धावा केल्या. यामध्ये स्टॉयनिसने 40 चेंडूत 72 धावांची खेळी केली. ही त्याची आयपीएलमधील सर्वोच्च धावांची खेळी आहे. त्याने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा स्विकारला होता. त्याने आयुष बडोनीबरोबर 89 धावांची भागीदारी केली.

तसेच निकोलस पूरनबरोबर 76 धावांची खेळी केली. त्यामुळे लखनऊला आयपीएल इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाची धावसंख्या उभारता आली.

त्यानंतर 257 धावांचे रक्षण करताना मात्र स्टॉयनिस गोलंदाजी करताना दुखापतग्रस्त झाला. महत्त्वाचे म्हणजे तो पहिल्या षटकात गोलंदाजीला उतरला होता. त्याने या षटकात पंजाब किंग्सचा कर्णधार शिखर धवनला बाद केले. पण नंतर स्टॉयनिस त्याचे दुसरे षटक टाकत असताना अथर्व तायडेने त्याच्या गोलंदाजीवर एक जोरदार फटका मारला. त्यावर तो चेंडू आवडवताना त्याच्या डाव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली.

त्यावेळी लखनऊचा मेडिकल स्टाफही मैदानावर आला होता. पण त्यांनी त्याची दुखापत पाहून त्याला बाहेर जाण्याचा सल्ला दिला. त्याने नंतर गोलंदाजी केली नाही. त्याच्या षटकातील उर्वरिक एक चेंडू आयुष बडोनीने टाकला. स्टॉयनिसने 1.5 षटके गोलंदाजी करताना 21 धावा देताना १ विकेट घेतली.

दरम्यान, आता स्टॉयनिसची ही दुखापती किती गंभीर आणि आणि तो पुढे खेळू शकणार आहे की नाही, याबद्दल लखनऊकडून माहिती देण्यात आलेली नाही.

सामन्याबद्दल सांगायचे झाल्यास 258 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबला 19.5 षटकात सर्वबाद 201 धावा करता आल्या. पंजाबकडून तायडेने सर्वाधिक 66 धावांची खेळी केली. तसेच लखनऊकडून नवीन-उल-हकने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Birch Fire Case: हडफडे अग्निकांडातील मुख्य आरोपी लुथरा बंधू उद्या गोव्यात होणार दाखल; ट्रान्झिट रिमांड मिळाल्याने कारवाईला वेग VIDEO

IPL Mini Auction 2026: धोनीच्या चेन्नईत नव्या दमाच्या खेळाडूंची एन्ट्री! दोन अनकॅप्ड खेळाडूंवर 28 कोटींची उधळण; प्रशांत वीर आणि कार्तिक शर्मा कोट्यधीश

"लग्न केवळ कागदावर उरलं असेल तर ते तोडणंच बरं!" 24 वर्षांपासून रखडलेल्या घटस्फोटाच्या वादावर सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

IPL Mini Auction 2026: केकेआरचा 'मास्टरस्ट्रोक'! मथीशा पाथिरानाला 18 कोटींत केलं खरेदी; सीएसकेच्या 'बेबी मलिंगा'वर शाहरुखने लावली मोठी बोली

Luthra Brothers Arrested: 'बर्च बाय रोमिओ लेन' च्या मालकांचा खेळ खल्लास! दिल्ली विमानतळावर लुथरा बंधूंना गोवा पोलिसांकडून अटक

SCROLL FOR NEXT