Rohit Sharma Dainik Gomantak
क्रीडा

IPL Video Viral: रोहितची बॅटिंग अन् नवीन उल हकची बॉलिंग, पण जयघोष 'कोहली... कोहली...'चा

मंगळवारी झालेल्या आयपीएल 2023 स्पर्धेतील LSG vs MI सामन्यावेळी रोहित शर्मा फलंदाजी करत असताना प्रेक्षकांमधून 'कोहली... कोहली...'च्या घोषणा देण्यात आल्या होत्या.

Pranali Kodre

Lucknow crowd's ‘Kohli’ chants when Rohit Sharma Batting: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत मंगळवारी लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात 63 वा सामना झाला. या सामन्यात मुंबईला केवळ 5 धावांनी पराभवाचा सामना करावा लागाला. पण याच सामन्यात एक अनोखी घटना पाहायला मिळाली.

'कोहली... कोहली'चे नारे

या सामन्यात लखनऊने मुंबईसमोर 178 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि ईशान किशन या सलामीवीरांनी चांगली सुरुवात केली होती. दरम्यान, ते फलंदाजी करत असताना लखनऊकडून जेव्हा नवीन-उल-हक गोलंदाजीला आला, तेव्हा प्रेक्षकांमधून विराट कोहलीच्या नावाच्या घोषणा दिल्या जात होत्या.

नवीनच्या गोलंदाजीवर ईशान आणि रोहित या दोघांनीही आक्रमक पवित्रा स्विकारला होता. त्यांनी नवीनच्या पहिल्या दोन षटकात 16 धावा काढल्या.

दरम्यान, स्टेडियममध्ये जेव्हा प्रेक्षकांकडून 'कोहली...कोहली...' असे नारे दिले जात होते, त्याचवेळी या डावाच्या पाचव्या षटकात नवीन गोलंदाजी करत असताना रोहितने एका धीम्या गतीच्या चेंडूवर स्क्वेअर लेगच्या दिशेने जवळपास 65 मीटर लांब षटकार मारला. या षटकाराचा व्हिडिओही सध्या व्हायरल होत आहे.

नवीन आणि विराटमध्ये झालेले भांडण

खरंतर 1 मे रोजी आयपीएल 2023 मध्ये लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या संघांमध्ये झालेल्या सामन्यात बेंगोलरचा फलंदाज विराट आणि नवीन यांच्यात वाद झाले होते. त्यांचे वाद सामन्यानंतरही पाहायला मिळाले होते.

तसेच त्याच सामन्यानंतर विराटचे लखनऊचा मार्गदर्शक गौतम गंभीरशीही वाद झालेले. त्याचमुळे अनेकदा विराटच्या चाहत्यांकडून लखनऊच्या सामन्यावेळी स्टेडियममध्ये त्याच्या नावावच्या घोषणा दिल्या जात असल्याचे पाहायला मिळाले आहे.

याच कारणामुळे मंगळवारी झालेल्या सामन्यादरम्यानही नवीनच्या गोलंदाजीवेळी प्रेक्षकांनी विराटच्या नावाच्या घोषणा दिल्याचे म्हटले जात आहे.

मुंबईचा पराभव

दरम्यान रोहित आणि ईशान यांनी सलामीला 90 धावांची भागीदारी केली होती. पण त्यानंतर कोणाला खास काही करता आले नाही. रोहितने 25 चेंडूत 37 धावांची खेळी केली, तसेच ईशानने 39 चेंडूत 59 धावांची अर्धशतकी खेळी केली. पण मुंबईचा डाव 20 षटकात 5 बाद 172 धावांवरच संपला.

महत्त्वाचे म्हणजे मुंबईला अखेरच्या दोन षटकात 30 धावांची गरज होती. त्यावेळी 19 व्या षटकात नवीन विरुद्ध टीम डेव्हिडने 2 षटकार आणि 1 चौकारासह 19 धावा चोपल्या होत्या. मात्र, अखेरच्या षटकात मोहसीन खानने शानदार गोलंदाजी करत 5 धावाच दिल्या. त्यामुळे मुंबईला या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला.

तत्पुर्वी या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना लखनऊकडून मार्कस स्टॉयनिसने 47 चेंडूत 4 चौकार आणि 8 षटकारांसह नाबाद 89 धावा केल्या. तसेच कर्णधार कृणाल पंड्याने 49 धावा केल्या. त्यामुळे लखनऊने 20 षटकात 3 बाद 177 धावा केल्या होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT