Virat Kohli - Naveen-Ul-Haq Dainik Gomantak
क्रीडा

'...ते सत्य नाही', आधी मैदानात भांडण अन् आता 'इंस्टा-वॉर'! Virat - Naveen च्या वादानंतर पोस्ट व्हायरल

सोमवारी आयपीएल २०२३ मधील सामन्यात झालेल्या मोठ्या भांडणानंतर विराट कोहली आणि नवीन उल हक यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्ट चर्चेत आल्या आहेत.

Pranali Kodre

Naveen-ul-Haq and Virat Kohli Cryptic Instagram Story: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत सोमवारी झालेल्या या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध 18 धावांनी विजय मिळवला. पण भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर झालेला हा सामना विराट कोहलीचे लखनऊचे खेळाडू आणि मार्गदर्शक गौतम गंभीर यांच्याबरोबर झालेल्या वादामुळे चांगलाच चर्चेत आला.

झाले असे की बेंगलोरने दिलेल्या 127 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना लखनऊने 8 विकेट्स गमावल्यानंतर अमित मिश्रा आणि नवीन-उल-हक फलंदाजी करत होते. त्यावेळी बेंगलोरचा खेळाडू विराट क्षेत्ररक्षण करत असताना त्याचे त्यांच्याशी शाब्दिक बाचाबाची झाली.

सामना झाल्यानंतरही विराट आणि नवीन यांच्यात हात मिळवत असताना वाद झाले. हे वाद पुढे इतके वाढले की लखनऊचा मार्गदर्शक गौतम गंभीर आणि विराट कोहली एकमेकांना भिडले. या वादाबद्दल सध्या विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत.

विराट-नवीनची इंस्टाग्राम स्टोरी

या वादानंतर मंगळवारी विराट आणि नवीन या दोघांनीही इंस्टाग्रावर टाकलेली स्टोरीही सध्या चर्चेत आहे. ही स्टोरी दोघांनीही सोमवारी झालेल्या वादाला अनुसरून टाकली असल्याचा कयासही चाहत्यांनी लावला आहे.

विराटने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये जी पोस्ट टाकली आहे त्यात लिहिले आहे की 'आपण जे काही ऐकतो, ते फक्त मत असते, सत्य नाही. आपण जे काही पाहातो, तो एक दृष्टीकोन असतो, सत्य नाही.

तसेच नवीनने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये कॅप्शन लिहिले आहे की 'तुम्ही ज्यासाठी पात्र आहात, ते तुम्हाला मिळते, ते असेच असायला हवे आणि ते असेच घडते.'

Virat Kohli - Naveen-Ul-Haq Instagram Story

बीसीसीआयकडून कारवाई

दरम्यान, या वादामुळे आयपीएलच्या आचार संहितेचा भंग झाल्याने बीसीसीआयकडून कारवाई झाली आहे. विराट आणि गंभीरवर सामनाशुल्काच्या 100 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे, तर नवीनवर सामनाशुल्काच्या 25 टक्के दंड झाला आहे.

बेंगलोरचा विजय

या सामन्यात बेंगलोरने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 9 बाद 126 धावा केल्या होत्या. बेंगलोरकडून कर्णधार फाफ डू प्लेसिसने सर्वाधिक 44 धावांची खेळी केली. तसेच विराटने 31 धावा केल्या. बाकी कोणाला खास काही करता आले नाही. लखनऊकडून नवीनने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

तसेच 127 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना लखनऊचा संघ 19.5 षटकात 108 धावांवरच सर्वबाद झाला. लखनऊकडून कृष्णप्पा गॉथमने सर्वाधिक 23 धावा केल्या. बाकी कोणाला 20 धावांचा टप्पाही ओलांडता आला नाही. बेंगलोरकडून जौश हेजलवूड आणि कर्ण शर्मा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या; वाचा गोव्यातील दिवसभरातील ठळक घडामोडी

SCROLL FOR NEXT