Lovelina Borgohain Gold Medal Asian Games 2026 Dainik Gomantak
क्रीडा

Asian Games 2026: हॅप्पी बर्थडे चॅम्पियन! लव्हलिना बोर्गोहेनने वाढदिवसाच्या दिवशी जिंकले ‘गोल्ड’; महिला बॉक्सिंगमध्ये भारताला 12 वर्षांनंतर सुवर्ण यश

Lovlina Borgohain Wins Asian Games Gold on Her Birthday: भारताची स्टार ऑलिम्पिक पदक विजेती बॉक्सर लव्हलिना बोर्गोहेनने एशियन गेम्स 2026 मध्ये 75 किलो वजनी गटात चीनच्या बाओ जीयीचा रोमांचक सामन्यात पराभव करत सुवर्णपदक पटकावले.

Manish Jadhav

Lovelina Borgohain Gold Medal Asian Games 2026: भारताची स्टार ऑलिम्पिक पदक विजेती बॉक्सर लव्हलिना बोर्गोहेनने एशियन गेम्स 2026 मध्ये 75 किलो वजनी गटात चीनच्या बाओ जीयीचा रोमांचक सामन्यात पराभव करत सुवर्णपदक पटकावले. महिला बॉक्सिंगमध्ये भारताला तब्बल 12 वर्षांनंतर हे सुवर्णपदक मिळाले. विशेष म्हणजे, लवलीनासाठी हा विजय अत्यंत खास ठरला, कारण तिने हा ऐतिहासिक पराक्रम आपल्या वाढदिवसाच्या दिवशी केली. तिने देशवासीयांना मोठी भेट दिली. या शानदार विजयामुळे संपूर्ण देशातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

याआधी हांगझोऊ एशियन गेम्समध्ये तिचे सुवर्णपदक थोड्यासाठी हुकले होते आणि यंदाच्या कॉमनवेल्थ गेम्समध्येही तिला रौप्य पदकावर समाधान मानवे लागले होते. महिलांच्या 75 किलो वजनी गटातील या अत्यंत अटीतटीच्या सामन्यात सुरुवातीपासूनच रोमांचक थरार पाहायला मिळाला. पहिल्या राउंडमध्ये चिनी खेळाडूने आक्रमक पवित्रा घेतला, परंतु लव्हलिनाने आपल्या अनुभवाचा आणि उत्कृष्ट संयमाचा परिचय देत हुशारीने गुण मिळवले आणि पहिला राउंड 3-2 ने आपल्या नावावर केला. त्यानंतर दुसऱ्या राउंडमध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये अटीतटीची टक्कर झाली, पण लव्हलिनाने बाजी मारत हा राउंड 4-1 ने जिंकला आणि सामन्यात 2-0 अशी भक्कम आघाडी घेत विजयाच्या दिशेने पाऊल टाकले.

तिसऱ्या आणि अंतिम राउंडमध्ये तर लव्हलिनाने पूर्णपणे आपला दबदबा निर्माण केला आणि चीनी खेळाडूला कोणतीही संधी न देता हा राउंड 5-0 अशा एकतर्फी फरकाने जिंकत सुवर्णपदक आपल्या नावावर केले. तिच्या या ऐतिहासिक कामगिरीनंतर आता इतर भारतीय बॉक्सर परवीन आणि अंकुश यांच्या आगामी सुवर्णपदकाच्या सामन्यांकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले. या सुवर्णयशासह भारताच्या (India) पदकतालिकेत मोठी भर पडली असून, एशियन गेम्समधील भारताची घोडदौड दिमाखात सुरु आहे. लव्हलिनासारख्या चॅम्पियन खेळाडूने वाढदिवसाच्या दिवशी मिळवलेले हे यश भारताच्या क्रीडा इतिहासात सुवर्णअक्षरांनी नोंदवले गेले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Calangute Open Drain Accident: आधी पर्यटकाचा मृत्यू, आता दाम्पत्याचा अपघात; कळंगुटमधील उघड्या गटारांचा धोका कायम

Crime New: झुआरीनगरमध्ये क्षुल्लक वादातून सशस्त्र हल्ला; 8 जखमी, तिघांची प्रकृती गंभीर

PMMVY: गर्भवती महिलांसाठी महत्त्वाची बातमी! केंद्र सरकारकडून 5,000 ते 6,000 रुपयांची मदत; अर्ज कसा अन् कुठे करायचा? जाणून घ्या सर्व

Cancer Medicines Price Reduction: कॅन्सर रुग्णांसाठी सरकारचा मोठा निर्णय! औषधं मिळणार अत्यंत स्वस्त दरात, किमती 70 टक्क्यांपर्यंत कमी होणार

ST Reservation: गोव्यात एसटी राजकीय आरक्षणाचा चेंडू निवडणूक आयोगाकडे; सरकारची सर्व प्रक्रिया पूर्ण, मुख्यमंत्र्यांचा दावा

SCROLL FOR NEXT