Lionel Messi  Dainik Gomantak
क्रीडा

Lionel Messi लवकरच खेळणार पी एस जीकडून?

एफसी बार्सिलोनाला (FC Barcelona) राम राम ठोकून लिओनल मेस्सी (Lionel Messi) पी एस जीकडून (PSG) खेळणार असे कळते आहे.

दैनिक गोमन्तक

एफसी बार्सिलोनाला (FC Barcelona) राम राम ठोकून लिओनल मेस्सी (Lionel Messi) पी एस जीकडून (PSG) खेळणार असे कळते आहे. बार्सिलोना नंतर मेस्सी कुठल्या क्लब कडून खेळणार याची सगळ्याच फुटबॉल फॅन्सला उत्सुकता आहे.

मेस्सीचा एफसी बार्सिलोना बरोबरचा सतरा वर्षांचा प्रवास गुरुवारी अखेर संपला. फुटबॉल जगताचा दैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेस्सीने बार्सिलोना बरोबर पुढचा करार केला नाही. बार्सिलोना क्लबने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडल वरून गुरुवारी ही माहिती दिली की मेस्सी आणि क्लबमध्ये काही अडचणीमुळे पुढचा करार झाला नाही म्हणूनच यापुढे मेस्सी बार्सिलोनाकडून खेळणार नाही. या घोषणेनंतर फुटबॉल जगतात एकच खळबळ उडाली. गेल्या काही दिवसांपासून मेस्सी बार्सिलोना सोडणार ही चर्चा होतीच मात्र क्लबच्या फॅन्ससाठी ही मोठी निराशाच आहे. सतरा वर्ष खेळत असताना मेस्सीने बार्सिलोनासाठी 672 गोल तर 35 चषकं जिंकून दिले आहेत.

वयाच्या 34 व्या वर्षी मेस्सी कुठल्या क्लबकडून खेळतो याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. काही दिवसांपूर्वी अशी चर्चा होती की मेस्सी हा इंग्लंडमधील मँचेस्टर सिटी कडून खेळेल. सिटीचे प्रशिक्षक असलेले पेप गर्डियलो यांचे मेस्सी बरोबर जुने संबंध आहेत. पेप हे बार्सिलोना संघाचे देखील प्रशिक्षक होते. मात्र या चर्चेला पेपी यांनीच पूर्णविराम दिला आणि सांगितले की मेस्सी सिटीकडून खेळणार नाही.

गुरुवार पासून मात्र या चर्चेला एक वेगळंच वळण मिळाल्याचे दिसत आहे. मेस्सी बार्सिलोना नंतर पी. एस. जी (पॅरिस सेंट जर्मेन) या संघाकडून खेळले जाणार असे वृत्त हाती येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार मेसीचे वडील जॉर्ज यांची पी एस जी संघाबरोबर चर्चादेखील झाली आहे आणि कॉन्ट्रॅक्ट देखील लवकरच करण्यात येईल. पी एस जीचे संचालक नसीर अल खेलाफी हे देखील मेस्सी बरोबर चर्चा करत असल्याचे वृत्त समोर आले आहे. पी एस जी क्लबचे प्रशिक्षक मौरोसिओ पोचेत्तीनो यांनी देखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मेस्सी पी एस जीकडून खेळू शकतो असे देखील त्यांनी म्हटले आहे.

ज्या संघात नेमार, एम्बाप्पे, सर्जिओ रामोस ई. यांच्यासारखे दिग्गज खेळाडू असताना मेस्सी देखील या संघातुन खेळला तर प्रतिस्पर्धी संघाची काही खैर नाही. रियल माद्रिद संघाचा माजी कर्णधार सर्जिओ रामोस हा देखील नुकताच या संघाचा भाग बनला आहे. एकेकाळचे कट्टर विरोधी म्हणजेच मेस्सी आणि रामोस हे एकत्र दिसतात का हे वेळच सांगेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

School Discipline: कच्च्या मडक्यांना योग्य वळण देणारी शाळेची शिकवण; विद्यार्थी आणि शिक्षकांची अविस्मरणीय गाथा

रुद्रेश्वरासमोर दामू नाईकांचे 'मिशन 27'! प्रदेशाध्यक्षांचा वाढदिवस, भाजपने केला निवडणुकीचा श्रीगणेशा

Opinion: शिक्षण, संशोधन आणि कौशल्यविकासाच्या संगमातून भारताचा दबदबा; 'विक्रम' चिप ठरते स्वदेशी सामर्थ्याचे प्रतीक

BITS Pilani: 'बिट्स पिलानीतील मृत्यूंची चौकशी करा, न्यायालयीन आयोग नेमावा', प्रतीक्षा खलप यांची मागणी

Asia Cup 2025: अर्शदीप सिंह रचणार इतिहास! आशिया कपमध्ये ठोकणार 'शतक'; अशी कामगिरी करणारा ठरणार पहिलाच भारतीय

SCROLL FOR NEXT