भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) हे दोन्ही देश कोणत्याही खेळात समोर-समोर उभे ठाकले कि टशन येतेच. दोन्हीकडील फॅन्स आपल्या खेळाडूंना आगदी मनापासून चेअर करतात. शनिवारी या दोघांमध्ये अशीच टशन पहावयास मिळणार आहे, ती म्हणजे, टोकियो ऑलिंपिकमध्ये (Tokyo Olympics) भालाफेक (Javelin throw final ) या प्रकारात अंतिम सामन्यात भारताचा नीरज चोप्रा (Neeraj Chopra) आणि पाकिस्तानचा अर्शद नदीम (Arshad Nadeem) हे दोघे जण गोल्ड मेडलसाठी भिडणार आहेत.
ग्रुप स्टेजमध्ये या दोघांनी आपआपल्या गटात जबरदस्त कामगिरी केली आहे. भारताचा स्टार खेळाडू नीरज चोप्राने 86.65 मीटर भालाफेक करत पहिला क्रमांक पटकावला. तर अर्शदने 85.16 मीटर भाला फेक करत तिसरा क्रमांक मिळविला आहे. नीरज ग्रुप ए मध्ये तर अर्शद ग्रुप बी मध्ये होता.
भारताला एथलेटिक्समध्ये आजवर एकदाही ऑलिम्पिक मेडल मिळालेले नाही. मिल्खा सिंग आणि पीटी उषा यांचे ब्रॉन्झ मेडल सेकंदापेक्षाही कमी अंतराने हुकले होते. त्यामुळे एथलेटिक्समध्ये पदकाचा हाच दुष्काळ नीरज यंदा सुवर्ण पदक घेऊनच संपवेल अशी देशाला आशा आहे. तसेच कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला हरवून टोकियो ऑलिंपिकमध्ये निरज पहिले सुवर्ण पदक भारतासाठी घेऊन येईल अशी आशा सर्वच भारतीयांना आहे. यापूर्वी एशियन गेम्समध्ये नीरजनं गोल्ड तर अर्शदनं ब्रॉन्झ मेडल मिळवले होते.
अर्शदला खरेतर क्रिकेटमध्ये करिअर करायचे होते. परंतु नीरजचा खेळ पाहून त्याने भालाफेकीक येण्याचा निर्णय घेतला. 2018 साली एशियन गेम्समध्ये त्याने ब्रॉन्झ मेडल पटकाविले होते. त्यानंतर त्याने हे सांगितले होते. या दोघांना जर्मनीच्या जोहानेस वेटरचे कडवे आव्हान असेल. त्याने 85.64 मीटर भालाफेक करत दुसऱ्या क्रमांकासह फायनलमध्ये प्रवेश केला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.