Jay Shah and Pragyan Ojha | Secretary of BCCI Jay Shah Dainik Gomantak
क्रीडा

Lionel Messi: ग्रेट भेट! वर्ल्डकप जिंकताच मेस्सीनं BCCI सचिवांसाठी पाठवले 'स्पेशल' गिफ्ट

मेस्सीने बीसीसीआय सचिव जय शाह यांच्यासाठी खास भेट पाठवली आहे.

Pranali Kodre

Lionel Messi: अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलर लिओनल मेस्सीचे चाहते जगभरात आहेत. भारतातही मेस्सी लोकप्रिय खेळाडूंपैकी एक आहे. अगदी मोठमोठ्या सेलिब्रेटींपासून ते सामान्य जनतेपर्यत त्याची लोकप्रियता दिसून येते. आता तर त्याने स्वाक्षरी केलेली त्याची जर्सी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांच्यासाठी पाठवली आहे.

भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू आणि गव्हर्निंग कौन्सिलमध्ये इंडियन क्रिकेटर्स असोसिएशनचे प्रतिनिधित्व करणारा प्रज्ञान ओझाने जय शाह यांचा मेस्सीची जर्सी हातात घेतलेला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या फोटोवर ओझाने कॅप्शन दिले आहे की 'दिग्गजाने त्याच्या शुभेच्छा आणि स्वाक्षरी केलेली मॅच जर्सी जय भाईंसाठी पाठवली आहे. प्रामाणिक व्यक्तिमत्त्व. आशा आहे की मलाही अशी जर्सी लवकरच मिळेल.'

(Lionel Messi send a signed jersey to the secretary of BCCI Jay Shah.)

मेस्सी नुकताच त्याच्या कारकिर्दीतील पाचवा आणि अखेरचा फुटबॉल वर्ल्डकप खेळला. त्याने हा वर्ल्डकप खेळताना अर्जेंटिनाला तब्बल 36 वर्षांनंतर विजेतेपदही जिंकून दिले. मेस्सीने या वर्ल्डकपमध्ये 7 गोल केले आणि 3 असिस्टही नोंदवले. त्याने त्याच्या कारकिर्दीत पाच वर्ल्डकपमध्ये 13 गोल नोंदवले आहेत.

तो फिफा वर्ल्डकप 2022 मधील सर्वोत्तम खेळाडूही ठरला. त्यामुळे तो वर्ल्डकपमध्ये दोनवेळा गोल्डन बॉल जिंकणारा पहिला खेळाडू ठरला. त्याने 2014 वर्ल्डकपमध्येही गोल्डन बॉल जिंकला होता.

तसेच मेस्सीने फिफा वर्ल्डकप 2022 मध्ये आणखी एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. तो एकाच वर्ल्डकपमध्ये साखळी फेरी, उपउपांत्यपूर्व फेरी, उपांत्यपूर्व फेरी, उपांत्य फेरी आणि अंतिम सामन्यात गोल करणारा पहिलाच खेळाडू ठरला.

तसेच आत्तापर्यंत मेस्सीने फुटबॉलमधील जवळपास सर्वच विजेतेपदे नावावर केले होते. पण केवळ वर्ल्डकपची कमी होती, ती कमीही मेस्सीने फिफा वर्ल्डकप 2022 चे विजेतेपद जिंकून पूर्ण केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT