Lionel Messi: मेस्सीच्या वर्ल्डकप विजयाच्या पोस्टनेही रचला इतिहास, वाचा नक्की काय झालंय

लिओनल मेस्सीने वर्ल्डकप जिंकल्यानंतर केलेल्या पोस्टने मोठा विक्रम केला आहे.
Lionel Messi | FIFA World Cup 2022 | Argentina | France
Lionel Messi | FIFA World Cup 2022 | Argentina | FranceDainik Gomantak
Published on
Updated on

FIFA World Cup 2022: फिफा फुटबॉल वर्ल्डकप 2022 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाने फ्रान्सचा पेनल्टी शुटआऊटमध्ये 4-2 अशा फरकाने पराभूत केले आणि विश्वविजतेपद मिळवले. याबरोबरच अर्जेंटिनाने 36 वर्षांनंतर विश्वविजयाची चव चाखली. इतकेच नाही तर पाचवा वर्ल्डकप खेळणाऱ्या लिओनल मेस्सीचेही विश्वविजेयाचे स्वप्न पूर्ण झाले.

दरम्यान, त्याने जगज्जेते बनल्यानंतर वर्ल्डकप ट्रॉफीबरोबरचे, संघसहकाऱ्यांबरोबरचे फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले होते. त्याच्या या पोस्टला 59 मिनियनपेक्षाही अधिक लाईक्स आल्या आहेत. त्यामुळे आता त्याची ही पोस्ट इंस्टाग्रामवरील सर्वात लाईक्स मिळालेली पोस्ट ठरली आहे.

यापूर्वी हा विक्रम ख्रिस गॉडफ्रे यांच्या अंड्याच्या फोटो पोस्टच्या नावावर होता. त्या फोटोला ५६ मिलियनहून अधिक लाईक्स आल्या होत्या. तसेच मेस्सीच्या पोस्टने ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या पोस्टलाही मागे टाकले आहे.

रोनाल्डोने काही दिवसांपूर्वीच लुइस व्ह्युटनच्या जाहिरातीची पोस्ट केली होती, ज्यात रोनाल्डो आणि मेस्सी चेस खेळताना दिसत होते. त्या फोटोला 42 मिलियनहून अधिक लाईक्स आल्या होत्या. आता मेस्सीच्या विश्वविजयाच्या पोस्टने रोनाल्डोच्या या पोस्टलाही मागे टाकले असून तो आता एका इंस्टाग्राम पोस्टला सर्वाधिक लाईक्स मिळालेला खेळाडू ठरला आहे.

मेस्सीची पोस्ट

मेस्सीने त्याच्या या विक्रमी पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते की 'जगज्जेते! मी याचे खूपदा स्वप्न पाहिले, मला ते हवे होते. मला अजूनही यावर विश्वास बसत नाहीये. माझ्या कुटुंबाचे, मला पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांचे आभार.'

'आम्ही पुन्हा सिद्ध केले की जेव्हा अर्जेंटियन्स एकत्र येऊन लढतात, तेव्हा ठरवलेले ध्येय पूर्णच करतात. या संघाची योग्यता वैयक्तिक खेळाडूपेक्षा अधिक आहे. हीच योग्यता सर्व अर्जेंटियन्सचे जे स्वप्न होते त्याचसाठी लढण्याची ताकद होती. आपण हे साधले.'

मेस्सीची मोलाची कामगिरी

अर्जेंटिनाला वर्ल्डकप जिंकून देण्यात मेस्सीने महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याने या वर्ल्डकपमध्ये 7 गोल केले होते. अंतिम सामन्यातही त्याने 2 गोल नोंदवले होते. तसेच तो एका वर्ल्डकपमध्ये साखळी फेरी, उपउपांत्यपूर्व, उपांत्यपूर्व, उपांत्य फेरीत आणि अंतिम सामन्यात गोल करणारा एकमेव खेळाडूही ठरला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com