Lionel Messi Dainik Gomantak
क्रीडा

Lionel Messi to Inter Miami: मेस्सीनं धुडकावली सौदीतील महागडी ऑफर? 'या' अमेरिकन क्लबमध्ये सामील होण्यास सज्ज

PSG मधून बाहेर पडल्यानंतर मेस्सी अमेरिकन क्लबशी करार करणार असल्याचे सांगितले जात आहे.

Pranali Kodre

Lionel Messi to Inter Miami:: अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनल मेस्सी गेली दोन वर्षे पॅरिस सेंट-जर्मेन (PSG) संघाकडून खेळत होता. पण आता या क्लबचा आणि मेस्सीचा मार्ग वेगळा झाला आहे. अशातच मेस्सी आता कोणत्या संघाकडून खेळणार अशा चर्चा होत आहेत.

पण नुकत्यात समोर आलेल्या बीबीसीच्या रिपोर्ट्सनुसार मेस्सी इंटर मियामी या अमेरिकन फुटबॉल क्लबमध्ये सामील होणार असल्याचे म्हटले जात आहे.

सात वेळचा बॅलन डी'ओर विजेता मेस्सी ऍपल आणि आदिदास यांसारख्या ब्रँडशीही मियामीबरोबरच्या कराराचा भाग म्हणून कोलॅबरेशन करणार असल्याचे म्हटले जात आहे.

तसेच मीडिया रिपोर्ट्सनुसार मेस्सीने सौदी अरेबियातील अल हिलाल क्लबने दिलेली महागड्या कराराची ऑफर नाकारली आहे. तसेच त्याने आता अमेरिकेत फुटबॉल खेळण्याचा निर्णय घेतला आहे.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की याआधी ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि करिम बेंझेमा सारख्या खेळाडूंनी सौदी अरेबियामध्ये खेळण्याला पसंती दिली असून रोनाल्डो अल-नासरकडून खेळत असून बेंझमा अल-इत्तिहाद क्लबकडून खेळत आहे.

दरम्यान, जर मेस्सीने खरंच मियामीबरोबर करार केला, तर तो पहिल्यांदाच युरोपबाहेरील क्लबकडून फुटबॉल खेळताना दिसेल. त्याने यापूर्वी बार्सिलोना आणि पीएसजी या युरोपमधील क्लबकडून फुटबॉल खेळले आहे.

गेल्या काही दिवसांपासून अशीही चर्चा होती की मेस्सी पुन्हा त्याच्या जुन्या बार्सिलोना क्लबमध्ये परतेल. त्याचे वडील जॉर्ज मेस्सी बार्सिलोनाचे अध्यक्ष जॉन लापोर्टा यांना या आठवड्याच्या सुरुवातीला भेटले होते. त्यामुळे मेस्सी पुन्हा बार्सिलोनात येऊ शकतो, या चर्चांना उधाण आले होते.

पण आता बीबीसीच्या रिपोर्ट्सनुसार मेस्सीने अमेरिकन फुटबॉल क्लबकडून खेळण्याचा निर्णय घेतला आहे.

मेस्सी आणि पीएसजीचा मार्ग झाला वेगळा

काही दिवसांपूर्वी मेस्सीने शनिवारी पीएसजीकडून क्लेरमाँटविरुद्ध लीग-1 मधील अखेरचा सामना खेळला. पण या सामन्यात पीएसजीला 2-3 अशा गोल फरकाने पराभव स्विकारावा लागला. या सामन्यानंतर मेस्सीचा पीएसजीबरोबरील करार संपुष्टात आला आहे.

मेस्सी गेली दोन वर्षे पीएसजीकडून खेळत होता. बार्सिलोनाबरोबर तब्बल १७ हंगाम खेळल्यानंतर करार संपल्यावर तो 2021 मध्ये पीएसजीमध्ये सामील झाला होता. पीएसजीकडून तो गेल्या दोन हंगामात 75 सामन्यांमध्ये 32 गोल केले. तसेच 35 असिस्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Belgaum Goa Highway: अर्धवट हत्ती ब्रिजचं काम सुरु होणार; बेळगाव-गोवा महामार्गावरील 'हा' रास्ता मार्ग दीड महिना बंद

Goa Drug Case: शिवोलीत 8.5 लाखांच्या अमलीपदार्थांसह नायजेरियन नागरिकाला अटक, गुन्हे शाखेची कारवाई

Anant Chaturdashi: "नव्या सुरुवातींचा, श्रद्धेचा आणि आशेचा दिवस" अनंत चतुर्दशीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

Goa: जीप समुद्रकिनाऱ्यावर घेऊन जाणं पर्यटकास पडलं महागात, पोलिसांनी ठोठावला दंड

Goa Politics: खरी कुजबुज; विजय मुख्यमंत्री झाले तर...

SCROLL FOR NEXT