Lionel Messi Ban: मेस्सीला 'ती' ट्रीप पडली महागात! दोन आठवड्यांसाठी झाला सस्पेंड

दिग्गज फुटबॉलपटू लिओनल मेस्सीवर दोन आठवड्यांच्या बंदीची कारवाई झाली आहे.
Lionel Messi
Lionel MessiDainik Gomantak
Published on
Updated on

Lionel Messi Ban: अर्जेंटिना आणि पॅरिस सेंट जर्मेन (PSG) संघाचा दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीवर दोन आठवड्यांची बंदीची कारवाई करण्यात आली आहे. त्याने सौदी अरेबियाची अनधिकृत ट्रिप केल्याने त्याच्यावर ही कारवाई झाली आहे. तो सध्या सुरु असलेल्या हंगामात पॅरिस सेंच जर्मे संघाची परवानगी न घेता सौदी अरमेबियाला गेला होता.

याबद्दल फ्रान्समधील वृत्तपत्र L'Equipe ने दिलेल्या अहवालानुसार मेस्सीने दोनवेळा सौदी अरेबियाची ट्रिप केली. त्याचमुळे त्याला दोन आठवड्यांसाठी बंदीला सामोरे जावे लागणार आहे. तसेच या अहवालात असेही म्हटले आहे की मेस्सीला संघाबरोबर खेळण्यासाठी आणि सराव करण्यासाठीही निर्बंध लावण्यात आले आहेत. तसेच त्याचे वेतनही कापण्यात येणार आहे.

Lionel Messi
FIFA World Cup विजयाचं कौतुक! Messi कडून जगज्जेत्या अर्जेंटिना टीमसाठी सोन्याचे आयफोन गिफ्ट, Photo Viral

तसेच काही रिपोर्ट्सनुसार मेस्सी त्याच्या व्यावसायिक करारामुळे सौदी अरेबियाला गेला होता. तो मध्य-पूर्व देशांच्या पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी गेला होता.

आता या बंदीमुळे मेस्सी आगामी लीग 1 मधील ट्रॉयस आणि अजाशिया संघाविरुद्ध आगामी सामने खेळू शकणार नाही. तो 21 मे रोजी होणाऱ्या ऑक्झेरे सामन्यातून पुनरागमन करू शकतो.

सध्या पीएसजी फ्रेंच फुटबॉल लीग 1 च्या गुणतालिकेत अव्वल क्रमांकावर आहे. त्यांनी आत्तापर्यंत 33 सामन्यांमध्ये 75 गुण मिळवले आहेत. त्यांच्यापाठोपाठ 70 गुणांसह मार्सिली संघ आहे, तर तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या लेंन्सने 69 गुण मिळवले आहेत.

Lionel Messi
Messi - Ronaldo: लहानग्या फॅननं 'मेस्सीच सर्वोत्तम' म्हणताच 'अशी' होती रोनाल्डोची रिऍक्शन, पाहा Video

दरम्यान, अद्याप मेस्सीने त्याच्यावरील निर्बंधाबाबत कोणतेही भाष्य केलेले नाही. पण गेल्या काही दिवसांमध्ये आलेल्या काही रिपोर्ट्सनुसार पीएसजी आणि मेस्सी यांच्यातील संबंध बिघडले आहेत. त्यांच्यातील करार वाढवण्याच्या बाबीमुळे तणाव वाढला असल्याचे म्हटले जात आहे. तसेच अनेक रिपोर्ट्सनुसार या चालू हंगामानंतर मेस्सी आणि पीएसजी यांच्यातील करार संपुष्टात येऊ शकतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com