Legends League Cricket 2023 Dainik Gomantak
क्रीडा

Legends League Cricket 2023: फायनलमध्ये रैनाच्या संघाचा पराभव, हरभजनचा 'टायगर्स' ठरला चॅम्पियन!

Legends League Cricket 2023: विजेतेपदाच्या लढतीत हरभजन सिंगच्या नेतृत्वाखालील मणिपाल संघाने शानदार कामगिरी करत ट्रॉफीवर कब्जा केला.

Manish Jadhav

Legends League Cricket 2023: लिजेंड्स लीग क्रिकेट 2023 चा अंतिम सामना 9 डिसेंबर 2023 रोजी सुरतमधील अरनाइजर्स हैदराबाद आणि मणिपाल टायगर्स यांच्यात खेळला गेला. विजेतेपदाच्या लढतीत हरभजन सिंगच्या नेतृत्वाखालील मणिपाल संघाने शानदार कामगिरी करत ट्रॉफीवर कब्जा केला. अंतिम सामन्यात हरभजन सिंगने नाणेफेक जिंकून सुरेश रैनाच्या नेतृत्वाखालील हैदराबादला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते.

दरम्यान, पहिल्यांदा फलंदाजी करताना अरनाइजर्स हैदराबाद संघाने निर्धारित षटकांत 5 गडी गमावून 187 धावा केल्या होत्या. हैदराबादसाठी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना, रिकी क्लार्कने 153.84 च्या स्ट्राइक रेटने 52 चेंडूत 80 धावांचे सर्वाधिक नाबाद अर्धशतक झळकावले. यादरम्यान त्याच्या बॅटमधून सहा चौकार आणि चार उत्कृष्ट षटकार आले. त्याच्याशिवाय, गुरकीरत सिंग मान हा संघाचा दुसरा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. संघासाठी चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने 177.77 च्या स्ट्राइक रेटने 36 चेंडूत 64 धावांचे योगदान दिले. दरम्यान, त्याच्या बॅटमधून आठ चौकार आणि दोन षटकार आले.

दुसरीकडे, अरनाइजर्स हैदराबादने दिलेले 188 धावांचे लक्ष्य मणिपाल टायगर्सने सहा चेंडू बाकी असताना पाच गडी गमावून सहज गाठले. संघासाठी पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना, असेला गुणरत्नेने 175.86 च्या स्ट्राइक रेटने 29 चेंडूत नाबाद 51 धावांची उत्कृष्ट खेळी खेळली. त्याच्याशिवाय रॉबिन उथप्पाने डावाची सुरुवात करताना 27 चेंडूत 40 धावांचे योगदान दिले आणि चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या अँजेलो परेराने 23 चेंडूत 30 धावांचे योगदान दिले.

तसेच, अंतिम सामन्यात मणिपाल टायगर्ससाठी पंकज सिंग हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने या सामन्यात आपल्या संघासाठी चार षटके टाकून आणि 43 धावा देऊन सर्वाधिक दोन यश मिळवले. स्टुअर्ट बिन्नी हा विरोधी संघ अरनाइजर्स हैदराबादसाठी सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज होता. त्याने आपल्या संघासाठी चार षटके टाकली आणि 20 धावा देऊन तीन विकेट्स घेतल्या. अंतिम सामन्यातील उत्कृष्ट फलंदाजीसाठी असेला गुणरत्नेला 'प्लेअर ऑफ द मॅच' म्हणून गौरवण्यात आले. त्याचबरोबर, थिसारा परेरा संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरीसाठी 'प्लेअर ऑफ द सिरीज' ठरला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session: म्हादईचा प्रश्न तापला! पाणी प्रश्नावरुन आलेमाव सभागृहात पुन्हा आक्रमक

ChatGPT: चॅटजीपीटीचा धक्कादायक चेहरा! किशोरवयीन मुलांना दिल्या ड्रग्ज अन् आत्महत्येच्या टीप्स; संशोधनातून खुलासा

"म्हादई गोंयची माय,15 कोटी खर्च, तरीही तारीख पे तारीख का?" आमदार बोरकरांचा विधानसभेत थेट सवाल

Video: व्हायरल होण्याच्या नादात तरुणाई बेभान! देशातील सर्वात लांब पुलावर लटकून पठ्ठ्याचा धोकादायक स्टंट; सोशल मीडियावर व्हिडिओ घालतोय धूमाकूळ

Sudan Army Airstrike: सुदानी लष्कराची मोठी कारवाई! दारफुर प्रांतातील विमानतळावर मोठा हवाई हल्ला; 40 कोलंबियन सैनिक ठार

SCROLL FOR NEXT