Legends League Cricket 2022: युसूफ पठाण का म्हणाला- 'टाइगर अभी जिंदा है बेटा'

व्हिडिओच्या शेवटी इरफान हसत हसत युसूफला विचारले, 'टाइगर अभी जिंदा है?' ज्यावर तो म्हणाला, 'टाइगर अभी जिंदा है बेटा.'
Yusuf Pathan
Yusuf PathanDainik Gomantak
Published on
Updated on

लेजेंड्स क्रिकेट लीगच्या पहिल्या सामन्यात धडाकेबाज फलंदाज युसूफ पठाणच्या खेळीच्या जोरावर इंडिया महाराजा (India)ने पाकिस्तानच्या मिसबाह-उल-हक आशिया लायन्स संघाचा 6 गडी राखून पराभव केला. इंडिया महाराजाच्या विजयाचा नायक म्हणून ओळखले जाणाऱ्या युसूफ पठाणने 40 चेंडूत 80 धावा केल्या. त्याने अवघ्या 28 चेंडूत अर्धशतक केले. पठाणने आपल्या खेळीत 5 षटकार आणि 9 चौकार लगावले. फलंदाजीव्यतिरिक्त त्याचा भाऊ इरफान पठाणने गोलंदाजीतही चांगली कामगिरी केली. सामन्यानंतर इरफानने युसूफसोबत मजेशीर संवाद साधला असून इरफानने त्याच्या इन्स्टाग्रामवर संभाषणाचा व्हिडिओ सुध्दा पोस्ट केला आहे.

Yusuf Pathan
सामन्यादरम्यान विराट कोहलीने 'या' भारतीय गोलंदाजाशी घेतला होता पंगा

व्हिडीओमध्ये इरफान ज्यावेळी 'कसे वाटत आहे आणि किती सराव केलास?' असे युसूफ ला विचारतो, तेव्हा युसूफ म्हणाला की, ' खूप चांगले वाटत आहे आणि पुढे म्हाणाला की, मी तब्बल दोन महिन्यांनंतर 3 ते 4 फलंदाजीचे सेशन सराव म्हणून केले, परंतु त्यातले सलग दोन सेशन असे केले की,त्यातला एक 30 मिनिट तर दुसरा आणि 40 मिनिटांचा होता. व्हिडिओच्या शेवटी इरफान (Irfan Pathan) हसत हसत युसूफला विचारले, 'टाइगर अभी जिंदा है?' ज्यावर तो म्हणाला, 'टाइगर अभी जिंदा है बेटा.'

हा व्हिडिओ अपलोड करताना इरफानने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'काय विजय होता, काय सामना होता आणि किती शानदार खेळी. युसूफ पठाण (Yusuf Pathan) हा बऱ्याच वेळा मैच विनर म्हणून ठरला आहे . यावेळी इंडिया महाराजा वेगवान गोलंदाज मुनाफ पटेलनेही युसूफ पठाणचे या व्हिडिओवर कमेंट करताना अभिनंदन केले. तर आयपीएल संघ कोलकाता नाईट रायडर्सनेही युसूफचे कौतुक केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com