David Warner Dainik Gomantak
क्रीडा

IND vs AUS: डावखुरा वॉर्नर अचानक करू लागला उजव्या हाताने बॅटिंग, नक्की काय झालं वाचा

David Warner: भारताविरुद्ध दुसऱ्या वनडेत वॉर्नरने अचानक फलंदाजी शैली बदलली होती.

Pranali Kodre

David Warner batting right handed against R Ashwin during 2nd ODI India vs Australia at Indore:

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात दुसरा वनडे सामना रविवारी पार पडला. इंदूरला झालेल्या या सामन्यात भारताने डकवर्थ लुईस नियमानुसार ९९ धावांनी विजय मिळवला. दरम्यान, या सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभवाला सामोरे जावे लागले असले, तरी डेव्हिड वॉर्नरच्या फलंदाजी शैलीने सर्वांचेच लक्ष वेधले.

डेव्हिड वॉर्नर डावखुरा फलंदाज आहे. मात्र, त्याने या सामन्यात आपली शैली बदलली, त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाच्या डगआऊटमध्येही हशा पिकला होता. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी ४०० धावांचे आव्हान ठेवले होते.

या आव्हानाचा पाठलाग करताना दुसऱ्याच षटकात ऑस्ट्रेलियाने दोन विकेट्स गमावलेल्या. पण ९ षटकांनंतर पावसामुळे खेळ थांबला होता. अखेर नंतर पुन्हा खेळ सुरू झाला, तेव्हा ऑस्ट्रेलियाला डकवर्थ लुईस नियमानुसार २४ षटकांमध्ये २६३ धावा करण्याचे आव्हान होते.

पण त्याचवेळी भारताचा ऑफ-स्पिनर आर अश्विनला चांगली लय मिळाली, त्यामुळे तो डावखुऱ्या फलंदाजांविरुद्ध घातक ठरू शकतो, हे लक्षात घेत डावखुऱ्या वॉर्नरने शैली बदलत उजव्या हाताने फलंदाजी करणे सुरू केले.

त्याने उजव्या हाताने फलंदाजी करताना काही शॉट्सही खेळले. पण नंतर अश्विननेही १५ व्या षटकात त्याला कॅरम बॉल टाकत जाळ्यात अडकवले. वॉर्नरने त्याला देण्यात आलेल्या पायचीत निर्णयाच्या विरोधात रिव्ह्यू न घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्याला माघारी परतावे लागले.

दरम्यान, वॉर्नरने उजव्या हाताने अचानक फलंदाजी करण्याची ही पहिली वेळ नाही. त्यानेय यापूर्वी टी२० लीगमध्ये असा प्रयोग केला आहे. तसेच अनेक रिपोर्ट्सनुसार त्याने भारत दौऱ्यावर येण्यापूर्वी देखील उजव्या आणि डाव्या अशा दोन्ही हातांनी फलंदाजी करण्याचा सराव केलेला आहे.

सामन्याबद्दल सांगायचे झाल्यास वॉर्नर ५३ धावांवर बाद झाला. त्यानंतर सीन ऍबॉटने ५४ धावांची खेळी केली, त्याने आणि जोश हेजलवूडने ९ व्या विकेटसाठी ७७ धावांची भागीदारी केली. पण त्यांना ऑस्ट्रेलियाला विजयापर्यंत पोहचवण्यात अपयश आले. ऑस्ट्रेलियाचा संघ २८.२ षटकात २१७ धावांवर सर्वबाद झाला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT