Lalit Modi Interview On Dawood Ibrahim Dainik Gomantak
क्रीडा

आयपीएल सट्टेबाजी ते दाऊदची धमकी... ललित मोदींच्या मुलाखतीने क्रिकेट जगतात खळबळ, केले अनेक मोठे खुलासे Watch Video

Lalit Modi Interview On Dawood Ibrahim: इंडियन प्रीमियर लीग (IPL) चे माजी कमिशनर ललित मोदी पुन्हा एकदा चर्चेत आले. प्रदीर्घ काळापासून भारताबाहेर परदेशात वास्तव्य करणाऱ्या ललित मोदींनी आपण कुठूनही पळून जात नसल्याचे स्पष्ट केले.

Manish Jadhav

Lalit Modi Interview On Dawood Ibrahim: इंडियन प्रीमियर लीग (IPL) चे माजी कमिशनर ललित मोदी पुन्हा एकदा चर्चेत आले. प्रदीर्घ काळापासून भारताबाहेर परदेशात वास्तव्य करणाऱ्या ललित मोदींनी आपण कुठूनही पळून जात नसल्याचे स्पष्ट केले. भारत हा एक जागतिक महासत्ता देश असून, अशा देशाच्या नजरेतून सुटून कुठेही फिरणे अशक्य आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. याचदरम्यान, त्यांनी क्रिकेट प्रशासनातून कायमची निवृत्ती घेण्यामागचे एक अत्यंत धक्कादायक कारण समोर आणले.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याच्या टोळीकडून मिळालेल्या जीवे मारण्याच्या अनेक धमक्यांमुळेच आपल्याला क्रिकेट जगतापासून दूर व्हावे लागले, असा खळबळजनक दावा ललित मोदींनी 'एएनआय' या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत केला.

ललित मोदींनी सांगितले की, आयपीएलच्या (IPL) सुरुवातीच्या वर्षांमध्ये त्यांनी मॅच-फिक्सिंग आणि स्पॉट-फिक्सिंगच्या विरोधात अत्यंत कडक भूमिका घेतली होती. त्यांच्या या कडक धोरणाचा थेट फटका दाऊद इब्राहिमच्या 'डी कंपनी'च्या अब्जावधी डॉलर्सच्या बेकायदेशीर सट्टेबाजीच्या साम्राज्याला बसत होता. त्यामुळे अंडरवर्ल्डसोबत त्यांचे संबंध प्रचंड बिघडले.

या सिंडिकेटच्या सट्टेबाजीवर बोलताना मोदी म्हणाले की, दाऊद स्वतः एक खूप मोठा बुकी असून तो क्रिकेटमधील सट्टेबाजी नियंत्रित करायचा. पूर्वी प्रत्येक सामन्यावर जवळपास 2 अब्ज डॉलर्सचा सट्टा लावला जायचा, जो आज वाढून तब्बल 4 अब्ज डॉलर्सवर पोहोचला. आता संपूर्ण मॅच फिक्स करण्याऐवजी प्रत्येक ओव्हर आणि बॉल फिक्स केले जातात, ज्यासाठी मैदानावर रुमाल काढणे किंवा विशिष्ट पद्धतीने वस्तू घासणे अशा गुप्त इशाऱ्यांचा वापर केला जातो.

आपल्याला गप्प राहण्यासाठी कोट्यवधी डॉलर्सच्या लाचेची ऑफर देण्यात आली होती, जी आपण नाकारली असे सांगताना मोदींनी 2012 मधील एका थरारक प्रसंगाचा उल्लेख केला. लंडनमधील एका फिक्सरने 'बाबा' नावाच्या एका वजनदार मध्यस्थाच्या पेंटहाऊसमध्ये रात्री उशिरा बैठक घडवून आणली होती. त्या बैठकीत बाबाने आपल्या टेरेसवरुन थेट सॅटेलाईट फोनद्वारे दाऊद इब्राहिमला फोन लावला आणि तो स्पीकरवर टाकला.

दाऊदला आयपीएलमध्ये एक संघ हवा होता. दाऊदने स्पीकरवर 'तुम्ही आमचे मित्र आहात, सर्व विसरुन जा' असे सांगितले, तरीही ललित मोदींनी या सिंडिकेटला सहकार्य करण्यास स्पष्ट नकार दिला.

या नकारानंतर ललित मोदींवर जगभरात हल्ले करण्याचे सत्र सुरु झाले. मुंबईत त्यांच्या घराबाहेर गोळीबार झाला, जोहान्सबर्ग आणि मोंटेनेग्रोमध्ये त्यांच्या हत्येचा कट रचण्यात आला. इतकेच नव्हे, तर त्यांच्या मुलाला लंडनमधील स्लोन स्ट्रीटवरुन अंमली पदार्थ तस्करांच्या माध्यमातून किडनॅप करण्यात आले. या सर्व प्रकारानंतर मुंबई पोलिसांनी त्यांना 'झेड' दर्जाची सुरक्षा दिली.

अखेर, आयपीएलचा दुसरा सीझन दक्षिण आफ्रिकेत हलवल्यामुळे अंडरवर्ल्डचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले, कारण त्यांचा हा सामना होणारच नाही यावर सट्टा होता. हा वाद तेव्हाच शांत झाला, जेव्हा ललित मोदींनी क्रिकेट प्रशासनातून पूर्णपणे संन्यास घेण्याची लेखी हमी दिली. छोटा शकीलने एका लाईव्ह मुलाखतीत 'ललित मोदींसोबतचे सर्व वाद मिटले' असल्याचे जाहीर केल्यानंतर हा छळ थांबला, ज्यासाठी मोदींना क्रिकेटचा कायमचा त्याग करावा लागला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

SAFF Championship: भारतीय महिला सहाव्यांदा अंतिम फेरीत, भूतानवर 1-0 फरकाने विजय; विजेतेपदासाठी गतविजेत्या बांगलादेशचे आव्हान

IND vs AFG ODI: टीम इंडियाला मोठा धक्का! हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे विराट कोहली अफगाणिस्तान विरुद्धच्या वनडे मालिकेतून बाहेर

Surya Gochar 2026: नोकरीत मान-सन्मान अन् व्यवसायात नफा! सूर्याचं 'ट्रिपल गोचर' 5 राशींना बनवणार श्रीमंत; धनलाभाचा मोठा योग

Cockroach Janta Party: 'निवड आयोगा'च्या विरोधाला 'कॉक्रोच अप्रोच'ची किनार

डोनाल्ड ट्रम्प यांच्या एलियन फाइल्समागचं धक्कादायक सत्य आलं समोर! चिनी प्रोफेसरच्या दाव्यानं खळबळ; जगाला दिला धोक्याचा इशारा

SCROLL FOR NEXT