Team India Dainik Gomantak
क्रीडा

IND vs WI: मालिकेवर कब्जा करण्यासाठी रोहित सेना सज्ज! पुन्हा दिसणार 'ही' जोडी

IND vs WI: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील निर्णायक सामना मंगळवारी होणार आहे.

Manish Jadhav

IND vs WI: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील निर्णायक सामना मंगळवारी होणार आहे. हा सामना जिंकणारा संघ मालिका आपल्या नावावर करेल.

पहिला सामना भारताने जिंकला आहे, तर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिज संघाने बाजी मारली. विंडीजचा संघ फार मजबूत नाही.

अशा परिस्थितीत त्यांच्या हातून मालिका गमावणे भारतासाठी चांगले होणार नाही. हे टाळण्यासाठी टीम इंडिया या निर्णायक सामन्यात आपल्या ब्रह्मास्त्राचा वापर करु शकते.

दरम्यान, वेस्ट इंडिजमध्ये आतापर्यंत झालेल्या सर्व सामन्यांमध्ये खेळपट्ट्या फिरकीपटूंना मदत करत असल्याचे दिसून आले आहे. अशा स्थितीत तिसर्‍या सामन्यात टीम इंडिया आपल्या फिरकी आक्रमणाला बळ देत विंडीजला ढेर करण्याची योजना आखू शकते.

त्यामुळे टीम इंडिया (Team India) तिसऱ्या सामन्यात लेगस्पिनर युजवेंद्र चहलला संधी देऊ शकते, जो अजूनही बाहेर बसलेला आहे. रोहित शर्माला दुसऱ्या वनडेत विश्रांती देण्यात आली असून तिसऱ्या सामन्याचे महत्त्व लक्षात घेऊन तो या सामन्यातही संघात पुनरागमन करु शकतो.

ही जोडी पुन्हा एकदा दिसणार

आम्ही टीम इंडियाच्या ज्या ब्रह्मास्त्राबद्दल बोलत आहोत, ते म्हणजे युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादव (Kuldeep Yadav) यांची जोडी. या दोघांची जोडी भारतासाठी खूप यशस्वी ठरली आहे. हे दोघे जेव्हा एकत्र खेळतात तेव्हा विरोधी संघाच्या फलंदाजांना अडचणीत आणतात.

या जोडीचे वैशिष्ट्य म्हणजे हे दोघेही मधल्या षटकांमध्ये विकेट घेण्यासाठी ओळखले जातात. 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीपासून ते 2019 च्या एकदिवसीय विश्वचषकापर्यंत या जोडीने भारतासाठी शानदार प्रदर्शन केले आहे.

परंतु इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या एकदिवसीय विश्वचषकाच्या सामन्यात दोघांना मोठा फटका बसला, त्यानंतर ही जोडी तुटली आणि त्यानंतर या दोघांपैकी एकाचीच प्लेइंग-11 मध्ये निवड होत राहिली.

त्यानंतर ही जोडी एकत्र दिसल्याचे फार कमी प्रसंग आले आहेत. पण फायनल जिंकण्यासाठी संघ व्यवस्थापन या जोडीला मैदानात उतरवू शकते. आतापर्यंत विंडीजच्या खेळपट्ट्यांवर फिरकीपटूंना मदत मिळताना दिसत आहे आणि हे पाहता रोहित हे मोठे पाऊल उचलू शकतो.

चहल कोणाच्या जागी खेळणार?

सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये कुलदीप प्लेइंग-11 चा भाग होता, मात्र चहलला संधी मिळाली नाही. पहिल्या दोन वनडेत उमरान मलिकला संघाने संधी दिली. पण तो फारसा प्रभाव टाकू शकला नाही. उमरान हा वेगवान गोलंदाज आहे. त्याच्या जागी चहलला संघात संधी मिळू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs Pak: भारत विरुद्ध पाकिस्तान 'महामुकाबल्या'त Team India ची प्लेइंग 11 कशी असेल? कोणाला डच्चू, कोणाला संधी?

Best Destination For Solo Travel: सोलो ट्रिपसाठी परफेक्ट! महिलांसाठी सुरक्षित मानली जाणारी 'ही' टॉप ठिकाणं, एकदा नक्की भेट द्या

Railway Accident: पत्नी दारूच्या नशेत रेल्वे ट्रकवर बसली, वाचवायला गेलेल्या पतीचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू; वेरोड्यातील दुर्घटना

Sal: भेडशीत तिळारी, दोडामार्गात मणेरी नावाने ओळखली जाणारी गोव्यातील शापुरा नदी; सौंदर्यसंपन्न बनलेला 'साळ गाव'

Mapusa Theft: पुन्हा त्याच ठिकाणी चोरी! दिवसाढवळ्या दुचाकी लंपास, म्हापसा बनतंय का चोरट्यांचे राज्य?

SCROLL FOR NEXT