Shardul Thakur Dainik Gomantak
क्रीडा

World Cup 2023 साठी शार्दुल ठाकूरची निवड योग्य की अयोग्य? भारताचेच दोन दिग्गज भिडले

Shardul Thakur: वर्ल्डकप 2023 साठी शार्दुल ठाकूरच्या टीम इंडियातील निवडीवरून भारताच्या दोन माजी क्रिकेटपटूंमध्ये शाब्दिक चकमक घडल्याचे पाहायला मिळाले.

Pranali Kodre

Krishnamachari Srikkanth argument with Sanjay Bangar on Shardul Thakur selection in India Squad for ODI Cricket World Cup 2023:

मंगळवारी (5 सप्टेंबर) वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेसाठी 15 जणांच्या भारतीय संघाची निवड करण्यात आली. या संघात वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर याचीही निवड झाली आहे. पण त्याच्या निवडीवरून भारताच्या दोन माजी क्रिकेटपटूंमध्ये शाब्दिक चकमक झाल्याचे दिसले.

अनेक माजी क्रिकेटपटूंनी संघाच्या निवडीवर समाधान व्यक्त केले आहे. मात्र, 1983 वर्ल्डकप विजेते क्रिकेटपटू के श्रीकांत यांनी मात्र शार्दुल ठाकूरच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

शार्दुलला अष्टपैलू खेळाडू म्हणून भारतीय संघात स्थान मिळाले आहे. मात्र, याच मुद्यावरून स्टार स्पोर्ट्सच्या लाईव्ह कार्यक्रमात के श्रीकांत आणि भारताचे माजी क्रिकेटपटू व माजी फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांच्यात मतभेद झाले.

श्रीकांत यांनी शार्दुलने वनडेत अद्याप त्याची अष्टपैलू क्षमता सिद्ध केली नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे त्याच्याऐवजी भारतीय संघ एखादा स्पेशालिस्ट फिरकीपटू किंवा वेगवान गोलंदाज निवडू शकत होते, असे ते म्हणाले.

श्रीकांत यांनी बांगर यांना प्रश्न विचारला की 'शार्दुल पूर्ण फलंदाज आहे का?' त्यावर बांगर यांनी 'कसोटी क्रिकेटमध्ये, हो' असे उत्तर दिले.

त्यावर श्रीकांत म्हणाले, 'मी वनडे क्रिकेटमध्ये म्हणत आहे, तो अष्टपैलू आहे का?' त्यानंतर बांगर म्हणाले, 'हो, तो आहे.' श्रीकांत नंतर म्हणाले, 'तो कसा अष्टपैलू आहे? वर्ल्डकप टी२० नंतर त्याची सर्वोत्तम खेळी 25 धावा आहे.'

त्यावर बांगर म्हणाले, 'त्याची गोलंदाजी चांगली आहे.' त्यानंतर श्रीकांत म्हणाले, 'तो चांगली गोलंदाजी करत आहे? त्याच्या कारकिर्दीत त्याने किती वेळा त्याचे १० षटके पूर्ण केली आहेत.'

त्यानंतर कार्यक्रमाच्या प्रेझेंटेटरने त्यांच्यातील वाद शमवण्याचा प्रयत्न केला. यानंतर बांगर यांनी असेही म्हटले की अर्शदीप सिंगची डावखुरा वेगवान गोलंदाज म्हणून शार्दुलच्या जागेवर निवड होऊ शकली असती. दरम्यान, नंतर बांगर आणि श्रीकांत यांनी एकमेकांना हाय-फाईव्ह देत वाद मिटवला.

श्रीकांत यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हटले की 'सर्वजण म्हणत आहेत की आपल्याला 8 व्या क्रमांकावर फलंदाज हवा, कोणाला 8 व्या क्रमांकावर फलंदाज हवा असतो? शार्दुल ठाकूर तिथे केवळ 10 धावा करतो आणि तो 10 षटकेही पूर्ण करत नाही.'

'नेपाळविरुद्ध (आशिया चषक 2023 मध्ये) त्याने किती षटके गोलंदाजी केली, फक्त ४. हे पाहा वेस्ट इंडिज किंवा झिम्बाब्वे विरुद्धची कामगिरी पाहू नका. नक्कीच त्याने तिथे चांगली कामगिरी केली असेल, तर ती लक्षात ठेवा, पण त्याला फार महत्त्व देऊ नका. त्यापेक्षा ऑस्ट्रेलिया किंवा न्यूझीलंड सारख्या संघाविरुद्धची कामगिरी लक्षात घ्या. त्याचमुळे मी म्हणत असतो की एकूण सरासरी पाहून फसवून घेऊ नका. नेहमीच वैयक्तिक सामने पाहा.'

दरम्यान, शार्दुल ठाकूरच्या एकूण कामगिरीबद्दल सांगायचे झाल्यास त्याने 40 वनडे सामने खेळले असून 59 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच एका अर्धशतकासह 318 धावा केल्या आहेत. त्याने यातील 7 वेळा सामन्यातील त्याच्या 10 षटके पूर्ण केली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Cup 2026 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! T20 वर्ल्ड कप 2026चे वेळापत्रक जाहीर; भारत-पाकिस्तान महामुकाबला कधी?

Goa ZP Election 2025: जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी 'आप-आरजीपी' युतीचे संकेत; मनोज परब म्हणाले, 'सर्व पर्याय खुले'!

T20 World Cup 2026: रोहित शर्मा बनला टी20 वर्ल्ड कप 2026 चा 'ब्रँड ॲम्बेसेडर'; जय शहांची मोठी घोषणा!

Navpancham Yog 2025: डिसेंबर महिन्यात 'या' 3 राशींच्या लोकांचे होणार बल्ले-बल्ले, नवपंचम योग ठरणार वरदान; धनलाभासह करिअरमध्ये सकारात्मक बदलाची चिन्हे!

Goa Politics: 'नोकरी घोटाळ्यातील एजंट भाजपचे', विजय सरदेसाईंचा मोठा गौप्यस्फोट; ढवळीकरांविरोधात षड्यंत्राचा आरोप

SCROLL FOR NEXT