World Cup 2023: ऑस्ट्रेलियन संघात अनुभवाचा भरणा! कमिन्स नेतृत्वातील 15 जणांची टीम जाहीर

World Cup 2023: भारतात होणाऱ्या वर्ल्डकप 2023 स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाच्या अंतिम 15 जणांच्या संघाची घोषणा करण्यासाठी आली आहे.
Australia Cricket Team
Australia Cricket TeamDainik Gomantak

Australia announced 15-player squad for ICC Men's Cricket World Cup 2023: भारतात होणाऱ्या वर्ल्डकप 2023 स्पर्धेसाठी आता एक महिन्यापेक्षाही कमी कालावधी राहिला आहे. अशा परिस्थितीत सहभागी संघांची अंतिम तयारी सुरु झाली असून संघांतील खेळाडूंच्याही घोषणा केल्या जात आहेत.

नुकतेच क्रिकेट ऑस्ट्रेलियानेही बुधवारी या वर्ल्डकपसाठी 15 जणांचा अंतिम संघ जाहीर केला आहे.

ऑस्ट्रेलियाने यापूर्वी गेल्या महिन्यात 18 जणांचा प्राथमिक संघ जाहीर केला होता. त्यातून 15 जणांची निवड करण्यात आली आहे.

या 18 जणांमधील ऍरॉन हार्डी, नॅथन एलिस आणि तन्वीर संघा यांना 15 जणांच्या संघात स्थान मिळालेले नाही. तसेच मार्नस लॅब्युशेनलाही संघात संधी मिळालेली नाही.

Australia Cricket Team
भारतापाठोपाठ दक्षिण आफ्रिकेचाही World Cup 2023 साठी संघ घोषित, 'या' खेळाडूकडे कॅप्टन्सी

दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या 15 जणांच्या संघात अनुभवाचा भरणा आहे. या संघाचे कर्णधारपद वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सकडे सोपवण्यात आलेले आहे.

त्याच्यासह संघात जोश हेजलवूड, मिचेल स्टार्क हे अनुभवी वेगवान गोलंदाज असून त्यांच्या साथीला सीन ऍबॉटही आहे.

त्याचबरोबर फिरकी गोलंदाजीसाठी ऍश्टन एगार आणि ऍडम झम्पा यांचे पर्याय आहेत. त्यांच्या साथीला अनुभवी अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलही असेल.

इतकेच नाही, तर मिचेल स्टार्क, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस स्टॉयनिस हे अष्टपैलू खेळाडूही संघात आहेत. हे अष्टपैलू फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागात आपले पूर्ण योगदान देऊ शकतात.

तसेच फलंदाजीत डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, ट्रेविस हेड या अनुभवी खेळाडूंचा समावेश आहे. त्याचबरोबर ऍलेक्स कॅरे आणि जोश इंग्लिस हे यष्टीरक्षक असतील.

Australia Cricket Team
भारतीय संघाची World Cup 2023 स्पर्धेसाठी घोषणा! रोहित कर्णधार, तर 'या' 15 खेळाडूंना संधी

तथापि, सध्या ऑस्ट्रेलियाचे पॅट कमिन्स, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क आणि ग्लेन मॅक्सवेल हे दुखापतींमधून सावरत आहेत. त्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाला अपेक्षित आहे की हे खेळाडू वर्ल्डकपपूर्वी पूर्ण तंदुरुस्त होतील.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकपपूर्वी भारताविरुद्ध वनडे मालिका खेळायची आहे. या मालिकेआधीच हे खेळाडू संघात परततील अशी आशा क्रिकेट ऑस्ट्रेलिया बाळगून आहे.

ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप स्पर्धेत नेदरलँड्स आणि पाकिस्तानविरुद्ध सराव सामने खेळायचे आहे. तसेच त्यांचा मुख्य स्पर्धेतील पहिला सामना भारताविरुद्धच 8 ऑक्टोबर रोजी होणार आहे.

  • असा आहे वर्ल्डकप 2023 स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलिया संघ - पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, ऍलेक्स कॅरे, जोश इंग्लिस, सिन ऍबॉट, ऍश्टन एगार, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेजलवूड, ट्रेविस हेड, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस, डेव्हिड वॉर्नर, ऍडम झम्पा, मिचेल स्टार्क

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com