FIFA World Cup 2022  Dainik Gomantak
क्रीडा

FIFA World Cup 2022: जगातील सर्वात श्रीमंत क्रीडा संघटना असलेली 'फिफा' कशी करते कमाई? घ्या जाणून...

विजेत्या संघाला मिळणार 347 कोटी रूपये; तर उपविजेत्या संघाला 248 कोटी

Akshay Nirmale

FIFA World Cup 2022: यंदाच्या फिफा वर्ल्डकप 2022 च्या विजेतेपदासाठी अर्जेंटिना आणि फ्रान्स हे संघ काही तासातच मैदानात उतरणार आहेत. ही स्पर्धा जिंकणाऱ्या संघाला जवळपास 347 कोटी रुपये बक्षीस मिळेल. त्याच वेळी, अंतिम फेरीत पराभूत झालेल्या संघाला सुमारे 248 कोटी रुपये मिळतील. तिसऱ्या क्रमांकाचा संघ 223 कोटी रुपये आणि चौथ्या क्रमांकाचा संघ 206 कोटी रुपये घेऊन जाईल.

फिफा ही जगातील सर्वात श्रीमंत क्रीडा संघटना आहे. त्यामुळेच फुटबॉल विश्वचषक खेळणाऱ्या संघांना इतर खेळांच्या तुलनेत भरपूर बक्षीस रक्कम दिली जाते. फिफाचे कमाईचे चार मार्ग आहेत. दूरदर्शन हक्क, विपणन हक्क, परवाना आणि तिकीट विक्री. या माध्यमातून कोट्यवधी रुपये फिफाकडे येतात, जे विविध देश आणि संघांना खेळचा प्रसार करण्यासाठई वितरीत केले जातात. त्यातून स्पर्धा आयोजित केल्या जातात.

दूरचित्रवाणी हक्क

फिफाचे बहुतेक पैसे टेलिव्हिजन हक्कांच्या लिलावातून येतात. अनेक कंपन्या FIFA च्या टीव्ही हक्कांसाठी बोली लावतात आणि सर्वाधिक बोली लावणाऱ्याला FIFA चे सामने प्रसारित करण्याचे अधिकार मिळतात. भारतातील FIFA विश्वचषक 2022 च्या प्रसारणाचे अधिकार स्पोर्ट्स 18 कडे आहेत. आता टीव्हीच्या डिजिटल प्रसारणाच्या अधिकारातुनही मोठी कमाई सुरू झाली आहे.

FIFA विश्वचषक स्पॉन्सर करण्यापासून ते सामन्यांदरम्यान त्यांची नावे आणि लोगो दिसण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रायोजक पैसे देतात. FIFA विश्वचषक 2022 मध्ये विपणन अधिकारांद्वारे FIFA ला मोठी रक्कम मिळाली आहे. फिफा विश्वचषक ब्रँड परवाना आणि रॉयल्टीद्वारेही पैसे कमवते.

तिकीट विक्री

फिफाला प्रत्येक सामन्याच्या तिकिटांच्या विक्रीतूनही भरपूर पैसे मिळतात. फिफा विश्वचषक स्पर्धेच्या बाद फेरीच्या तिकिटाची किंमत 15 लाखांच्या जवळपास आहे. यातून मिळणारे उत्पन्नही फिफाला जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Opposition Alliance: जनतेचे ऐका, महाआघाडी करा! दसऱ्यापर्यंत निर्णय घेण्याची सरदेसाईंची काँग्रेसकडे मागणी

खरी कुजबुज: बाबू पुन्हा आक्रमक...

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार थेट 69,000 रूपये होणार? 8व्या वेतन आयोगासमोर 3.833 फिटमेंट फॅक्टरची मागणी

CJP Protest Delhi: आंदोलकांवरील निर्बंधांवर सर्वोच्च न्यायालयाची पोलिसांना चपराक! रस्ते, मेट्रो आणि इंटरनेट सेवा पूर्ववत करण्याचे आदेश; प्रशासनाचे दणाणले धाबे

Stray Dogs Beach: समुद्रकिनाऱ्यांवरील भटक्या कुत्र्यांची दहशत मोडून काढणार! पर्यटन खात्याचा 15 ऑक्टोबरचा अल्टीमेटम!

SCROLL FOR NEXT