FIFA World Cup 2022 FInal: फिफा विश्वचषक 2022 फायनलच्या अंतिम सामन्याला अवघे काही तास उरले आहेत. अर्जेंटिना आणि फ्रान्स हे संघ एकमेकांना भिडण्यासाठी सज्ज आहेत. फ्रान्स सलग दुसऱ्यांदा ट्रॉफी जिंकण्यासाठी प्रयत्नांमध्ये कोणतीही कसर सोडणार नाही. तर लिओनेल मेस्सीचा संघ 36 वर्षांनंतर विजेतेपदाची नोंद करू पाहत आहे. विशेष म्हणजे, गत वर्ल्डकपमध्ये फ्रान्सने अर्जेंटिनाला पराभूत केले होते, त्याचा बदला घेण्याच्याही हेतून अर्जेंटना मैदानात उतरेल. अंतिम सामना कतारच्या हुसेन स्टेडियमवर खेळवला जाईल.
(Argentina Vs France)
अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सी आपल्या संघाला ट्रॉफी मिळवून देण्यासाठी जोरदार तयारीत आहे. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 12 सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी अर्जेंटिनाने 6 वेळा विजय मिळवला आहे, तर फ्रान्सने केवळ तीन वेळा विजय मिळवला आहे. त्याचवेळी तीन सामने अनिर्णित ठरले. पण 2018 च्या विश्वचषकात फ्रान्सच्या संघाने बाद फेरीत अर्जेंटिनाचा 4-3 असा पराभव केला. या सामन्यात मेस्सीला एकही गोल करता आला नाही, तर एमबाप्पेने दोन गोल केले. 4 वर्षांनंतर मेस्सीचा संघ त्यांच्या जखमा भरून काढण्याचा प्रयत्न करेल.
दोन्ही संघांनी आतापर्यंत दोनदा जेतेपद पटकावले आहे. फ्रान्सने 1998 आणि 2018 मध्ये विश्वचषक ट्रॉफीवर नाव कोरले होते. त्याचवेळी अर्जेंटिनाने त्याआधी 1978 आणि 1986 मध्ये ट्रॉफी जिंकली होती. 36 वर्षांनंतर, लिओनेल मेस्सीला त्याच्या संघासाठी ट्रॉफी जिंकून या स्पर्धेला अलविदा करायला आवडेल. याआधी मेस्सीने 2014 मध्ये वर्ल्डकपची फायनल खेळली होती. त्यादरम्यान संघाला जर्मनीकडून पराभवाला सामोरे जावे लागले होते.
2018 च्या विश्वचषकादरम्यान, मेस्सीला फ्रान्सविरुद्ध एकही गोल करता आला नाही. मात्र या सामन्यात तो 4 वर्षांपूर्वीची जखम भरून काढण्याच्या आशेने मैदानात उतरणार आहे. पण त्याचा सामना मेस्सीप्रमाणेच या स्पर्धेत पाच गोल करणाऱ्या फ्रेंच अनुभवी किलियन एमबाप्पेशी होणार आहे. हुसेन स्टेडियमवर दोन्ही खेळाडूंमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.