FIFA World Cup 2022: मेस्सी-एमबाप्पेच्या गोलची संख्या सेम, मग कोणाला मिळणार गोल्डन बूट?

गोल्डन बूट पुरस्काराचे काय नियम आहेत, जाणून घ्या.
Kylian Mbappe and Lionel Messi
Kylian Mbappe and Lionel MessiDainik Gomantak

Kylian Mbappe and Lionel Messi: फिफा फुटबॉल वर्ल्डकप 2022 स्पर्धेतील अंतिम सामना रविवारी खेळला जाणार आहे. हा सामना अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्स यांच्यात लुसैल स्टेडियमवर हा सामना होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8.30 या सामन्याला सुरूवात होईल.

दरम्यान, दोन्ही संघात विजेतेपदासाठी तर झुंज पाहायला मिळेलच, पण त्याचबरोबर दोन्ही संघाच्या काही खेळाडूंमध्ये गोल्डन बुट पुरस्कारासाठीही शर्यत असेल.

Kylian Mbappe and Lionel Messi
FIFA World Cup 2022: ...तर फ्री सेक्स; फ्रान्सच्या 'या' महिलांची फिफाच्या फायनलपूर्वी खास ऑफर

गोल्डन बुट हा फिफा वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूला दिला जातो. सध्या या शर्यतीत अर्जेंटिनाचा लिओनल मेस्सी आणि फ्रान्सचा एमबाप्पे प्रत्येकी 5 गोलसह अव्वल क्रमांकावर आहेत. त्यामुळे या दोघांमध्येही आज गोल करण्याची चढाओढ असेल.

तसेच या शर्यतीत फ्रान्सचा ऑलिव्हर गिरोड आणि अर्जेंटिनाचा ज्युलियन अल्वारेज देखील आहेत. या दोघांनी प्रत्येकी 4 गोल केले आहेत.

पण, अनेकांना हा प्रश्न पडला असेल की जर मेस्सी आणि एमबाप्पे यांच्या गोलची संख्या सामन्याच्या शेवटपर्यंत सारखी राहिली, तर गोल्डन बूट मिळणार कोणाला. तर गोल्डन बूटच्या नियम असे सांगतात की जर दोन खेळाडूंच्या गोलची संख्या सारखी असेल, तर कोणत्या खेळाडूने पेनल्टीच्या मदतीने कमी गोल केले.

Kylian Mbappe and Lionel Messi
FIFA World Cup 2022: फ्रान्सचा मार्ग बिकट; फायनलपूर्वी संघाला आजारपणाचे ग्रहण

पण जर पेनल्टीवर केलेल्या गोलची संख्याही सारखी असेल, तर मग त्या दोघांपैकी कोणी सर्वाधिक असिस्ट केले याचा विचार केला जातो. ज्याने सर्वाधिक असिस्ट केले असते, त्याला हा पुरस्कार मिळतो. मात्र, जर असिस्टची संख्याही सारखी असेल, तर मग त्या दोन खेळाडूंपैकी ज्याने मैदानावर कमी वेळ घालवला असेल, त्याला हा पुरस्कार दिला जातो.

मेस्सी की एमबाप्पे, कोणाचे पारडे जड?

गोल्डन बूटच्या नियमांचा विचार केल्यास सध्या एमबाप्पे मेस्सीच्या पुढे आहे. कारण मेस्सीने त्याच्या 5 गोलपैकी 3 गोल पेनल्टीवर केले आहेत. तर एमबाप्पेने त्याचे सर्व मैदानी गोलच केले आहेत. त्यामुळे जर या दोघांच्या गोलची संख्या शेवटपर्यंत सारखी राहिली, तर एमबाप्पे गोल्डन बूटवर आपला हक्क सांगू शकतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com