Boxing Team

 

Dainik gomantak

क्रीडा

नॉकडाऊन वॉरियर्स संघ बॉक्सिंगमध्ये विजेता, गोवन वेव्हज संघावर 6-5 ने केली मात

अतिशय चुरशीच्या झुंजीनंतर नॉकडाऊन वॉरियर्सच्या जेसिका हिने गोवन वेव्हजच्या श्रीशा हिच्यावर 3-2 गुणफरकाने विजय नोंदवून संघाला करंडक जिंकून दिला

दैनिक गोमन्तक

पणजी : गोवा (goa) हौशी बॉक्सिंग संघटनेतर्फे घेण्यात आलेल्या सांघिक बॉक्सिंग (Boxing) स्पर्धेत नॉकडाऊन वॉरियर्स संघाने विजेतेपद मिळविले. अंतिम लढतीत त्यांनी गोवन वेव्हज संघावर 6-5 फरकाने निसटती मात केली. स्पर्धा पेडे-म्हापसा येथील बॉक्सिंग हॉलमध्ये झाली.

अंतिम फेरीत एकूण 11 लढती होत्या. दहा लढतीनंतर 5-5अशी बरोबरी झाल्यानंतर एलिट महिला गटातील लढत निर्णायक ठरली. अतिशय चुरशीच्या झुंजीनंतर नॉकडाऊन वॉरियर्सच्या जेसिका हिने गोवन वेव्हजच्या श्रीशा हिच्यावर 3-2 गुणफरकाने विजय नोंदवून संघाला करंडक जिंकून दिला. महिला गटातील ही लढत तिसऱ्या फेरीपर्यंत लांबली.

साहिल वैदांडे स्पर्धेतील (Competition) उत्कृष्ट तांत्रिक बॉक्सर ठरला. श्रीशा जम्पुला स्पर्धेतील उत्कृष्ट पराभूत बॉक्सर ठरली. अंतिम लढतीत मनन तिवारी (गोवन वेव्हज), लक्ष्मण तोरळकर (नॉकडाऊन वॉरियर्स), अर्जुन लमाणी (नॉकडाऊन वॉरियर्स), जीत रॉय (गोवन वेव्हज), नीतेश चव्हाण (नॉकडाऊन वॉरियर्स), साहिल वैदांडे ((गोवन वेव्हज), गोपाळ नाईक (नॉकडाऊन वॉरियर्स), श्रावणी गौरव (गोवन वेव्हज), चांदनी शर्मा (गोवन वेव्हज), प्रीती चव्हाण (नॉकडाऊन वॉरियर्स), जेसिका कार्रा (नॉकडाऊन वॉरियर्स) यांनी आपापले सामने जिंकले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Road Diversions: ‘आयर्नमन 70.3’ मुळे गोव्यात वाहतूक मार्गात बदल! पर्यायी रस्ते कोणते? जाणून घ्या..

Kala Academy: 'कला अकादमीच्या दुरुस्तीचे लेखापरीक्षण, चौकशी करा'! कला राखण मांडची मागणी; सचिवांशी विविध विषयांवर चर्चा

Goa Crime: 4 नाही 13 कोटींचा घोटाळा! गोव्यासह महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, गुजरातपर्यंत पसरले जाळे; जालन्यातून एकाला अटक

Lotulim Land Scam: लोटलीत जमीन विक्री घोटाळा उघड! राजकारण्याची गुंतवणूक असल्याचे उघड; संशयित ज्येष्ठ महिलेवर गुन्हा

Ranji Trophy 2025: गोव्याशी भिडणार RCBचा कॅप्टन! रणजी करंडकमध्ये रंगणार थरार; 15 वर्षांनंतर चुरशीची लढत

SCROLL FOR NEXT