Team India Dressing Room BCCI
क्रीडा

IND vs PAK: 'बेस्ट फिल्डर ठरलाय...' अन् अचानक भारतीय खेळाडू करू लागले KL राहुलला चिअर

India Cricket Team: भारतीय क्रिकेट संघाने वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत प्रत्येक सामन्यानंतर सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाचे पदक देण्याच्या परंपरेला सुरुवात केली आहे.

Pranali Kodre

ICC Cricket World Cup 2023, India vs Pakistan, KL Rahul Video:

भारतीय क्रिकेट संघाने वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धा सुरू झाल्यानंतर एक नवी परंपरा सुरु केली आहे. प्रत्येक सामन्यानंतर भारताच्या ड्रेसिंग रुममध्ये त्या सामन्यातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाचे पदक दिले जाते.

आत्तापर्यंत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीला, तर अफगाणिस्तानविरुद्ध शार्दुल ठाकूरला हे पदक मिळाले. त्यानंतर आता शनिवारी पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवल्यानंतरही हे पदक देण्यात आले. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाचे पदक यावेळी यष्टीरक्षक केएल राहुलला देण्यात आले.

दरम्यान, दरवेळी भारताचे क्षेत्ररक्षक प्रशिक्षक टी दिलीप या पदकविजेत्या खेळाडूची घोषणा करतात. यावेळीही त्यांनी केली, पण यावेळी त्यांनी नाव न सांगता टीव्हीवर त्या खेळाडूचे फोटो आणि व्हिडिओ दाखवले. याचा व्हिडिओ बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दिसते की टी दिलीप भारताच्या ड्रेसिंग रुममध्ये पाकिस्तानविरुद्ध शानदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचे कौतुक केले. यावेळी त्यांनी केएल राहुलच्या यष्टीरक्षणाचेही कौतुक केले.

तसेच नंतर सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून त्याच्या नावाची घोषणा केली. यादरम्यान, भारतीय खेळाडू एकमेकांची मस्करी करतानाही दिसले. तसेच जेव्हा केएल राहुलची सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून निवड झाली आणि त्याच्या यष्टीरक्षणाचे व्हिडिओ दाखवण्यात आले, तेव्हा त्याच्या व्हिडिओला दाद देतानाही दिसले.

नंतर गेल्या सामन्यात हे पदक जिंकलेल्या शार्दुल ठाकूरने केएल राहुलला हे पदक प्रदान केले. हा व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.

पाकिस्तानविरुद्ध केएल राहुलने शानदार यष्टीरक्षण केले होते. त्याने हार्दिक पंड्याच्या गोलंदाजीवर इमाम-उल-हकचा अफलातून झेलही घेतला.

दरम्यान, या सामन्यात पाकिस्तान संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला होता. पाकिस्तानची सुरुवात चांगली झाली होती. त्यांनी 30 षटकांच्या आतच 150 धावांचा टप्पाही पार केला होता.

मात्र, 30 व्या षटकात मोहम्मद सिराजने बाबर आझमला 50 धावांवर बाद केले. त्यानंतर मात्र, पाकिस्तानचा डाव गडगडला. पाकिस्तानने बाबर बाद झाल्यानंतर अखेरच्या 7 विकेट्स फक्त 36 धावांत गमावल्या. त्यामुळे पाकिस्तान संघ 42.5 षटकात 191 धावांवर सर्वबाद झाला. बाबर व्यतिरिक्त मोहम्मद रिझवानने 49 धावांची खेळी केली.

भारताकडून गोलंदाजी करताना जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

त्यानंतर 192 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने शुभमन गिलची (16) विकेट लवकर गमावली. पण नंतर रोहित शर्माने आधी विराट कोहलीबरोबर(16) 56 धावांची भागीदारी केली. त्यानंतर श्रेयस अय्यरबरोबर 77 धावांची भागीदारी करत भारतासाठी विजय सोपा केला.

रोहितने 86 धावांची अर्धशतकी खेळी केली. रोहित बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यरने केएल राहुलला (19*) साथीला घेत विजय मिळवून दिला. श्रेयसने 53 धावांची नाबाद खेळी केली. पाकिस्तानकडून शाहीन शाह आफ्रिदीने 2 विकेट्स घेतल्या आणि हसन अलीने 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT