भारताचा नवा उपकर्णधार KL राहुल (KL Rahul)  Dainik Gomantak
क्रीडा

IND vs NZ: राहुल द्रविडसोबत काम करण्यास अन् नवीन आव्हान स्विकारण्यास उत्सुक

पुढील वर्षी होणाऱ्या T20 विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेसाठी संघाने तयारी सुरू केली आहे का? आमच्या मनात ते आहे, पण आम्ही एकावेळी एकाच मालिकेचा विचार करत आहे. असे के.एल.राहुल (KL Rahul) याने स्पष्ट केले.

दैनिक गोमन्तक

भारत (India) विरुध्द न्यूझीलंड (New Zealand) यांच्यात 17 नोव्हेंबर पासून सुरु होणाऱ्या तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिल्या सामन्यापूर्वी भारताचा नवा उपकर्णधार KL राहुल (KL Rahul) सोमवारी पत्रकार परिषदेत बोलताना अनेक गोष्टी स्पष्ट केल्या आहेत.

राहुल म्हणाला, प्रत्येकजण राहुल द्रविडच्या (Rahul Dravid) कोचिंग आणि रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळण्यास उत्सुक आहे. संघाचा उपकर्णधार असल्यामुळे माझ्यावर आता अतिरिक्त जबाबदारी आहे, परंतु तो मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडसोबत काम करण्यास आणि आव्हान स्वीकारण्यास उत्सुक आहे

तरुणांना सुधारण्याची जबाबदारी

उपकर्णधाराबरोबरच आणखीन एक अतिरिक्त जबाबदारी आमच्यावर असेल, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ड्रेसिंग रूममध्ये असे वातावरण तयार करणे जिथे नवीन खेळाडूंना आल्यावर आनंद वाटेल आणि ते मैदानात जाऊन स्वतःला सिध्द करु शकतील. राहुल द्रविडसह आम्ही पुढील दोन आठवडे नवीन कोचिंग स्टाफसोबत काम करण्यास उत्सुक आहोत.

हार्दिक पांड्याला संघातून वगळण्याबाबत बोलताना राहुल म्हणाला, याबाबत मला काय झाले ते मला माहित नाही. पण त्याला माहित आहे की काय करायचे, संघाला त्याच्याकडून काय अपेक्षित आहे. हे समजण्याइतपत तो हुशार आहे.

प्रशिक्षक राहुल द्रविडबाबत बोलताना तो म्हणाला, मी भाग्यवान आहे की मी त्यांना खूप दिवसांपासून ओळखतो. कर्नाटक संघातील आम्हा सर्वांना त्यांची खूप मदत झाली. त्यांनी देशभरातील मुलांना खूप मदत केली आहे. राहुल द्रविड हे किती मोठे नाव आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे, त्यांच्याकडून शिकण्याची आणि क्रिकेटपटू म्हणून चांगले बनण्याची आमच्याकडे चांगली संधी आहे.

पुढील वर्षी होणाऱ्या T20 विश्वचषक स्पर्धेसाठी संघाने तयारी सुरू केली आहे का? यावर राहुल म्हणाला, आमच्या मनात ते आहे, पण आम्ही एकावेळी एकाच मालिकेचा विचार करत आहे.

रोहितबद्दल बोलताना तो म्हणाला, कर्णधारपदात त्याला काही नवीन नाही. त्याने यापूर्वीही टीम इंडियाचे कर्णधारपद भूषवले आहे. त्याची खेळाबद्दलची विचारसरणी सर्वांनाच माहिती आहे. आम्ही सर्वजण रोहितच्या नेतृत्वाखाली खेळण्यास उत्सुक आहोत. न्यूझीलंडविरुद्ध निवडलेल्या भारतीय संघात अनेक नवे खेळाडू पाहायला मिळणार आहेत. यापूर्वी अनेक खेळाडू भारताकडून खेळले आहेत, तर काही खेळाडू पदार्पण करणार आहेत.

भारताचा T20 संघ: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), रुतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, आर अश्विन, अक्षर पटेल, आवेश खान, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, हर्षल पटेल, मोहम्मद. सिराज

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

World Cup 2025: टीम इंडियासाठी 'करो या मरो'चा सामना, उपांत्य फेरी गाठण्यासाठी 'विजय' आवश्यक; इंग्लंडविरुद्ध 'अशी' असेल Playing 11

Goa Diwali Bazar: पणजी, दिवचल भरला दिवाळी बाजार...

Pakistan-Afghanistan War: "पाकिस्तान क्रिकेट को बर्बाद करना चाहता है…" माजी अफगाण कर्णधाराची शत्रू देशावर टीका

राजधानीत नरकासुराचा 'हाहाकार', दिवाळीची तयारी जोरदार ; Watch Video

जब तक सूरज - चांद रहेगा तब तक पर्रीकर- रवि तुम्हारा नाम रहेगा! मागोवा

SCROLL FOR NEXT