T20 World Cup: विजयानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडूंचे अतरंगी सेलिब्रेशन पाहा व्हिडिओ

स्पर्धेच्या 14 वर्षांच्या इतिहासात प्रथमच टी-20 विश्वचषकाचे विजेतेपद पटकावण्यात ऑस्ट्रेलिलयाला यश आले आहे. हाच विजय ऑस्ट्रेलियन संघाने T20 विश्वचषकातील ड्रेसिंग रुममध्ये देखील दणक्यात साजरा केला.
T20 World Cup: Australian team crazy shoes calibration in dressing room after final match
T20 World Cup: Australian team crazy shoes calibration in dressing room after final match Twitter @ICC

T20 विश्वचषकात (T20 World Cup) काल अंतिम सामन्यात (T20 World Cup Final) न्यूझीलंड (New Zealand) विरुद्ध जोरदार विजय मिळवल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाचा (Australia) आनंद गगनात मावत नव्हता. कालच्या विजयांनंतर ऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच T20 क्रिकेटचा चॅम्पियन बनला आहे (AusVsNZ). स्पर्धेच्या 14 वर्षांच्या इतिहासात प्रथमच टी-20 विश्वचषकाचे विजेतेपद पटकावण्यात ऑस्ट्रेलिलयाला यश आले आहे. हाच ऑस्ट्रेलियन संघाने T20 विश्वचषकातील ड्रेसिंग रुममध्ये देखील दणक्यात साजरा केला. (T20 World Cup: Australian team crazy shoes calibration in dressing room after final match)

T20 World Cup: Australian team crazy shoes calibration in dressing room after final match
2021 T20 World Cup Final: ऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच बनला T20 चॅम्पियन

ऑस्ट्रेलियाच्या अशाच एका अजब आणि भन्नाट सेलिब्रेशनचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. ड्रेसिंग रुममध्ये शूजमध्ये बिअर घालून ऑस्ट्रेलियन खेळाडू 'जॅम' करतानाचा व्हिडिओ आयसीसीने आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ऑस्ट्रेलियन खेळाडू त्यांचे बूट काढताना आणि नंतर त्यात बिअर टाकून ती पिताना दिसत आहे. ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टॉइनिससह ऑस्ट्रेलियन संघातील अनेक खेळाडू हे सेलिब्रेशन करताना दिसत आहेत.

मात्र, शूज मध्ये बिअर घालून ती पिण्याची सेलिब्रेशन व्यक्त करण्याची ही पद्धत नवीन नाही. ऑस्ट्रेलियन फॉर्म्युला वन रेसर डॅनियल रिकार्डोनेही आपल्या विजयाचं असच सेलिब्रेशन केलं होत. आता ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघही त्यांच्या प्रसिद्ध पद्धतीने सेलिब्रेशन करताना दिसले. शूजमधून जाम पिण्याव्यतिरिक्त, खेळाडू आनंदी झाले आणि यशासाठी एकमेकांना शुभेच्छा दिल्या.

दरम्यान काल झालेल्या सामन्यात डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्शच्या झंझावाती खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने विश्वचषक जिंकला. न्यूझीलंडचे 173 धावांचे आव्हान पूर्ण करण्यात ऑस्ट्रेलियाला फारशी अडचण आली नाही. मार्श आणि वॉर्नरच्या झंझावाती अर्धशतकांमुळे ऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच T20 वर्ल्ड चॅम्पियन बनला. वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडचाही ऑस्ट्रेलियाच्या विजयात मोलाचा वाटा होता. हेजलवूडने 4 षटकात 16 धावा देत 3 बळी घेतले. त्याचवेळी अंदम झाम्पानेही 4 षटकात 26 धावा देत 1 बळी घेतला.

तर न्यूझीलंडकडून कर्णधार केन विल्यमसनने अप्रतिम खेळी केली. विल्यमसनने 48 चेंडूत 85 धावा केल्या, पण वॉर्नर आणि मार्शसमोर त्याची खेळी निराशाजनक ठरली. वॉर्नर आणि मार्शने दुसऱ्या विकेटसाठी 92 धावांची भागीदारी करुन न्यूझीलंडची विजयाची संधी हिरावून घेतली.नाणेफेक गमावल्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या किवी संघाची सुरुवात खराब झाली. चौथ्या षटकात केवळ 11 धावा देऊन डॅरेल मिशेल हेझलवूडचा बळी गेला. मार्टिन गप्टिलने अतिशय संथ खेळ केला आणि पॉवरप्लेमध्ये न्यूझीलंडच्या संघाला 6 षटकात केवळ 32 धावा करता आल्या. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी पहिल्या 10 षटकांमध्ये न्यूझीलंडच्या फलंदाजांना रोखून धरले. किवी संघाला 10 षटकात केवळ 57 धावा करता आल्या. न्यूझीलंडने शेवटच्या 10 षटकांत अप्रतिम पुनरागमन केले. विशेषत: कर्णधार केन विल्यमसनने 32 चेंडूत अर्धशतक तर 48 चेंडूत 85 धावा केल्या. त्याच्या या खेळीच्या जोरावर किवी संघाने 172 धावांपर्यंत मजल मारली पण ऑस्ट्रेलियन संघासाठी या धावा कमी होत्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com