Team India X/BCCI
क्रीडा

IND vs ENG: तिसऱ्या कसोटीपूर्वी टीम इंडियात मोठा बदल; प्रमुख फलंदाज संघाबाहेर, तर 23 वर्षीय खेळाडूला संधी

India vs England, 3rd Test: इंग्लंडविरुद्ध राजकोटला होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघात मोठा बदल करण्यात आला आहे.

Pranali Kodre

India make one change in squad for third Test against England:

भारत विरुद्ध इंग्लंड संघात पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिले दोन सामने पूर्ण झाले आहेत, तर 15 फेब्रुवारीपासून राजकोटला तिसरा सामना सुरू होणार आहेत. मात्र, या सामन्यापूर्वीच भारतीय संघाला एक धक्का बदला आहे.

राजकोटला होणाऱ्या तिसऱ्या कसोटीतून अनुभवी फलंदाज केएल राहुल बाहेर झाला झाला.इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित तिन्ही कसोटीसाठी भारतीय संघाची निवड काही दिवसांपूर्वीच करण्यात आली होती. यात केएल राहुलचाही समावेश होता. मात्र त्याची उपलब्धता त्याच्या तंदुरुस्तीवर अवलंबून होती.

मात्र आता बीसीसीआयने माहिती दिली आहे की केएल राहुल अद्याप पूर्ण तंदुरुस्त झालेला नाही. त्यामुळे तो तिसऱ्या कसोटीत खेळणार नाही. त्यामुळे आता भारतीय संघव्यवस्थापनाला आशा असेल की रांचीला 23 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या चौथ्या कसोटीपूर्वी केएल राहुल पूर्ण तंदुरुस्त होईल.

केएल राहुलने पहिल्या कसोटीनंतर मांडीमध्ये वेदना असल्याची तक्रार केली होती. त्यानंतर त्याला दुसऱ्या कसोटीला मुकावे लागले आणि आता त्याला तिसरा सामनाही खेळता येणार नाही.

याबद्दल बीसीसीआयने माहिती दिली आहे की राहुलने 90 टक्के त्याची तंदुरुस्ती मिळवली आहे आणि तो बीसीसीआयच्या मेडिकल टीमच्या देखरेखीखाली पूर्ण तंदुरुस्ती मिळवण्याच्या प्रयत्नात आहे.

तो चौथ्या आणि पाचव्या कसोटीसाठी पूर्ण तंदुरुस्ती मिळवण्याच्या दृष्टीने बंगळुरूमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (NCA) काम करत आहे.

बदली खेळाडूची घोषणा

केएल राहुल तिसऱ्या कसोटीतून बाहेर झाल्याने बीसीसीआयने त्याच्या जागेवर बदली खेळाडूची घोषणा केली आहे. केएल राहुलच्या जागेवर कर्नाटकचा २३ वर्षीय फलंदाज देवदत्त पडिक्कलला भारतीय संघात संधी देण्यात आली आहे.

त्यामुळे पडिक्कलला आता कसोटी पदार्पण करण्याची संधी मिळू शकते. यापूर्वी पडिक्कल भारताकडून 2021 मध्ये श्रीलंकेविरुद्ध 2 टी20 सामने खेळला आहे.

  • तिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), आर अश्विन, रवींद्र जडेजा (तंदुरुस्तीवर अवलंबून), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप, देवदत्त पडिक्कल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tarun Tejpal Case: तेजपालला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का; 3 आठवड्यांत तुरुंगात आत्मसमर्पण करण्याचे आदेश

Goa E20 Petrol: 'ई-20'चा सर्वाधिक फटका गोव्याला? केजरीवालांचा भाजप सरकारवर निशाणा; 40 टक्क्यांहून गोमंतकीयांकडे चारचाकी

Goa Congress: विधानसभा तिकीटासाठी 4 कोटींची बोली? खर्गेंच्या हॉटेल बिलावरूनही ग्रासियस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप

Pakistan AC Blast: पाकिस्तान हादरलं! रुग्णालयात एसी कॉम्प्रेसरचा भीषण स्फोट, 15 नवजात बालकांचा आगीत होरपळून मृत्यू; VIDEO

खरी कुजबुज: धो धो आश्वासने!

SCROLL FOR NEXT