IND vs ENG: इंग्लंडला मोठा धक्का! भारताविरुद्धच्या उर्वरित कसोटी मालिकेतून अनुभवी गोलंदाज बाहेर

India vs England, Test Series: भारताविरुद्धच्या उर्वरित कसोटी मालिकेतून इंग्लंडचा अनुभवी गोलंदाज बाहेर झाला आहे.
England Test Team | Jack Leach
England Test Team | Jack LeachX/englandcricket
Published on
Updated on

England's lead spin bowler ruled out of the remainder of the Test series against India:

भारत आणि इंग्लंड संघात सध्या पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील दोन सामने झाले असून 15 फेब्रुवारीपासून तिसरा सामना खेळला जाणार आहे. मात्र, त्यापूर्वीच इंग्लंडला मोठा धक्का बसला आहे.

इंग्लंडचा प्रमुख फिरकी गोलंदाज जॅक लीच उर्वरित आगामी तिन्ही कसोटी सामन्यातून बाहेर झाला आहे. याबद्दल रविवारी (11 फेब्रुवारी) इंग्लंड क्रिकेट बोर्डाने माहिती दिली आहे.

लीचला भारताविरुद्ध हैदराबादला झालेल्या या मालिकेतील पहिल्या कसोटीदरम्यान डाव्या गुडघ्याला दुखापत झाली होती. याच दुखापतीमुळे लीच दुसऱ्या कसोटीत खेळला नव्हता. आता तो उर्वरित मालिकेतूनही बाहेर झाला आहे. त्यामुळे तो आता अबुधाबीमधून पुन्हा घरी परत जाईल.

England Test Team | Jack Leach
IND vs ENG: राजकोटमध्ये चालणार अश्विनच्या फिरकीची जादू? कुंबळेच्या रेकॉर्डशी बरोबरी करण्याची संधी

दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात 9 दिवसांचे मोठे अंतर असल्याने इंग्लंड संघ अबुधाबीमध्ये सरावासाठी गेला आहे. ते राजकोटला होणाऱ्या तिसऱ्या कसोटीपूर्वी पुन्हा भारतात येतील.

इंग्लंडने लीचच्या दुखापतीबद्दल सांगितले की त्याच्यावर इंग्लंड आणि त्याच्या देशांतर्गत संघाचे सोमरसेटचे वैद्यकीय पथक लक्ष ठेवेल.

दरम्यान, अद्याप इंग्लंडने लीचच्या बदली खेळाडूची घोषणा केलेली नाही. सध्या इंग्लंडच्या संघात लीचच्या व्यतिरिक्त रेहान अहमद, टॉम हर्टली आणि शोएब बाशीर हे फिरकीपटू आहेत. तसेच जो रुटही पार्ट टाईम फिरकी गोलंदाजी करतो.

England Test Team | Jack Leach
IND vs ENG: विराट कोहली संपूर्ण कसोटी मालिकेतून बाहेर, एका नव्या चेहऱ्याला मिळणार संधी

मालिकेत बरोबरी

दरम्यान, हैदराबादला झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने विजय मिळवला होता, तर विशाखापट्टणमला झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने विजय मिळवला होता. त्यामुळे सध्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी झालेली आहे.

  • असा आहे इंग्लंडचा कसोटी संघ - झॅक क्रावली, बेन डकेट, जो रुट, डॅनिएल लॉरेन्स, बेन स्टोक्स (कर्णधार), रेहान अहमद, जॉनी बेअरस्टो (यष्टीरक्षक), बेन फोक्स (यष्टीरक्षक), ओली पोप, जेम्स अँडरसन, गस ऍटकिन्सन, शोएब बाशीर, टॉम हर्टली, ऑली रॉबिन्सन, मार्क वूड.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com