KL Rahul - Sai Sudharsan X/BCCI
क्रीडा

SA vs IND: दुसऱ्या वनडेत टीम इंडियाचं कुठे चुकलं, ज्यामुळे झाला पराभव? कर्णधार राहुल म्हणाला...

South Africa vs India: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या दुसऱ्या वनडेत भारताला पराभवाचा धक्का बसला.

Pranali Kodre

South Africa vs India, 2nd ODI at Gqeberha, KL Rahul:

दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात वनडे मालिकेतील दुसरा सामना गकेबेरामध्ये मंगळवारी (19 डिसेंबर) पार पडला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने 8 विकेट्सने विजय मिळवला. त्यामुळे तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी झाली.

या पराभवानंतर भारतीय संघाचा कर्णधार केएल राहुलने म्हटले की भारतीय संघाला साधारण 50 धावा कमी पडल्या, तसेच नंतर भारतीय संघाला लवकर विकेटही घेतला आली नाही, या गोष्टी भारताच्या पराभवाला जबाबदार ठरल्या.

कर्णधार केएल राहुल म्हणाला...

केएल राहुल म्हणाला, 'कदाचीत दक्षिण आफ्रिकेला नाणेफेक जिंकणे फायद्याचे ठरले, कारण खेळपट्टीकडून पहिल्या डावात मदत मिळत होती. ही कठीण खेळपट्टी होती, पण साई आणि मी स्थिरावलो होतो, आम्ही आणखी खेळू शकलो असतो आणि शतकही करू शकतो, त्यामुळे आम्हाला आणखी 50-60 धावांची भर घालता आली असती. पण या सामन्यातून आम्ही याच गोष्टी शिकून पुढे जाऊ.'

'जर आम्ही 240 च्या आसपास पोहचलो असतो, तर ते चांगले झाले असते. पण दुर्दैवाने आम्ही नियमित कालांतराने विकेट्स घालवल्या आणि त्यांना खेळपट्टीकडूनही चांगली मदत मिळाली.'

केएल राहुल पुढे म्हणाला, 'आम्ही प्रत्येक खेळाडूच्या क्षमतेवर आणि त्याच्या योजनेवर विश्वास टाकला आहे. ज्यामुळे त्यांना कंफर्टेबल वाटणार आहे, तेच आम्ही त्यांना सांगत आहोत, क्रिकेटमध्ये हे बरोबर आणि हे चूक असे नसते. तुम्ही खेळाडूंच्या योजनेवर विश्वास ठेवायला हवा.'

'पहिल्या 10 षटकात आम्हाला मदत मिळाली, अनेकदा आम्ही त्यांच्या फलंजादानां चकवले, पण आम्हाला दुसऱ्या बाजूने आम्ही ते कायम करू शकलो नाही. आम्ही जर विकेट्स घेऊ शकलो असतो, तर त्यांच्यावर दबाव टाकू शकलो असतो. आम्ही जे झाले, ते मैदानावरच सोडून पुढच्या सामन्यावर लक्ष केंद्रीत करणार आहे.

भारताचा पराभव

या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर 212 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेकडून टोनी डी झोर्झीने 122 चेंडूत नाबाद 119 धावांची शतकी खेळी केली. या खेळीत त्याने 9 चौकार आणि 6 षटकार मारले.

तसेच रिझा हेड्रिक्सने 81 चेंडूत 52 धावा केल्या. हेड्रिक्स आणि झोर्झी यांच्यात 130 धावांची सलामी भागीदारी झाली. तसेच रस्सी वॅन डर ड्युसेन 36 धावांवर नाबाद राहिला. भारताकडून अर्शदीप सिंग आणि रिंकू सिंग यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

तत्पुर्वी, भारताकडून साई सुदर्शनने सर्वाधिक 62 धावांची खेळी केली, तसेच केएल राहुने 56 धावा केल्या. मात्र, या दोघांव्यतिरिक्त भारताकडून कोणालाही 20 धावांचा टप्पा पार करता आला नाही. त्यामुळे भारताचा डाव 46.2 षटकात 211 धावांवर संपुष्टात आला. 

दक्षिण आफ्रिकेकडून नांद्रे बर्गरने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच ब्युरान हेंड्रिक्स आणि केशव महाराज यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या, तर लिझाद विल्यम्स आणि कर्णधार एडेन मार्करम यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT