KL Rahul Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2022: केएल राहुल रचतोय इतिहास; एकाच प्रतिस्पर्ध्याविरुद्ध तीनवेळा 'शतक'

लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल रविवारी आयपीएलमध्ये एकाच प्रतिस्पर्ध्याविरुद्ध तीन शतके झळकावणारा पहिला फलंदाज ठरला आहे.

दैनिक गोमन्तक

लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल (KL Rahul) रविवारी आयपीएलमध्ये (IPL) एकाच प्रतिस्पर्ध्याविरुद्ध तीन शतके झळकावणारा पहिला फलंदाज ठरला आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स (MI) विरुद्ध इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 च्या 37 व्या सामन्यात अप्रतिम शतक ठोकून राहुलने ही कामगिरी केली आहे. (KL Rahul has completed 3 centuries against Mumbai Indians)

एलएसजीच्या कर्णधाराने पाच वेळच्या चॅम्पियन MI विरुद्ध नाबाद 103 धावांची खेळी करून त्याच्या संघाला एकूण 168 धावांपर्यंत पोहोचवण्याची मजल मारली, जिथे त्यांनी एमआयचा 36 धावांनी पराभव करत विजय स्वत:च्या नावावर केला. आयपीएल 2022 मधील मुंबई इंडियन्सविरुद्ध राहुलचे हे तिसरे शतक आहे.

16 एप्रिल रोजी, राहुलने ब्रेबॉर्न स्टेडियमवर काही दिवसांपूर्वी पाच वेळच्या चॅम्पियन MI विरुद्ध 9 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने नाबाद शतक 103 झळकावले आहे. तर लखनौने ती लढत 18 धावांनी आरामात जिंकली.

राहुलने तीन वर्षांपूर्वी वानखेडे स्टेडियमवर एमआयविरुद्ध आयपीएलमधील पहिले शतक ठोकले होते. आयपीएल 2022 मध्ये मुंबई आणि लखनऊ यांच्यातील पहिल्या सामन्यातही राहुलने या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध शतक झळकावले आहे. केएल राहुलने रविवारी टी-20 क्रिकेटमध्ये भारतीय क्रिकेटपटूकडून सर्वाधिक शतके झळकावण्याच्या रोहित शर्माच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

Raj - Uddhav Thackeray: मुंबईत दुमदुमला 'आवाज मराठी'चा; 20 वर्षानंतर राज - उद्धव एकत्र

"हॉटेलचं जेवण चाखल्यावर घरचं आवडेल का?" प्रेमानंद महाराजांनी सांगितलं तरुणांच्या घटस्फोटांचं मुख्य कारण; Watch Video

Crime News: लाकडाच्या भुशात दारु लपवली, कर्नाटकच्या गाडीला गोव्याची नंबरप्लेट लावली; केरी नाक्यावर 12 लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

Goa News Live Updates: झाड पडलेल्या घराची वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांनी केली पाहणी

SCROLL FOR NEXT