KL Rahul Dainik Gomantak
क्रीडा

IND vs PAK: वनडे क्रिकेटमध्ये केएल राहुलचा मोठा करिष्मा, किंग कोहलीच्या विक्रमाशी केली बरोबरी!

Team India News: केएल राहुलने आशिया चषक 2023 च्या सुपर-4 सामन्यात पाकिस्तानविरुद्ध 14 धावा करुन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठी कामगिरी केली आहे.

Manish Jadhav

Asia Cup 2023: टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज केएल राहुलने 6 महिन्यांनंतर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करुन एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

केएल राहुलने आशिया चषक 2023 च्या सुपर-4 सामन्यात पाकिस्तानविरुद्ध 14 धावा करुन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठी कामगिरी केली आहे. राहुलने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील विराट कोहलीच्या मोठ्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.

केएल राहुलने सहा महिन्यांनंतर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आणि पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात 28 चेंडूत नाबाद 17 धावा केल्या.

कोहलीच्या या मोठ्या विक्रमाची बरोबरी केली

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात केएल राहुलने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करत असे काही केले ज्याची खूप चर्चा होत आहे.

केएल राहुलने पाकिस्तानविरुद्ध (Pakistan) आशिया कप 2023 च्या सुपर-4 सामन्यात 14 धावा करुन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2000 धावा पूर्ण केल्या आहेत. केएल राहुल आता विराट कोहलीसह भारतासाठी 2000 धावा पूर्ण करणारा तिसरा वेगवान फलंदाज बनला आहे.

केएल राहुलने 55 एकदिवसीय सामन्यांच्या 53 व्या डावात 2000 धावा पूर्ण केल्या आहेत. विराट कोहलीने 56 एकदिवसीय सामन्यांच्या 53व्या डावात 2000 धावा पूर्ण केल्या होत्या.

या यादीत बड्या दिग्गजांचा समावेश आहे

भारतासाठी (India) सर्वात जलद 2000 एकदिवसीय धावा करणाऱ्यांबद्दल बोलायचे झाल्यास, तो विक्रम शिखर धवनच्या नावावर आहे. शिखर धवनने 49 एकदिवसीय सामन्यांच्या 48 व्या डावात 2000 धावा पूर्ण केल्या होत्या.

या यादीत सौरव गांगुली आणि नवज्योत सिंग सिद्धू संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहेत. सौरव गांगुली आणि नवज्योत सिंग सिद्धू यांनी आपापल्या 2000 वनडे धावा पूर्ण करण्यासाठी 52-52 डाव खेळले होते. यानंतर केएल राहुल आणि विराट कोहली संयुक्तपणे तिसऱ्या स्थानावर आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live Updates: अवैध वास्तव्य प्रकरणी मांद्रे पोलिसांकडून युगांडाच्या नागरिकाला अटक

Goa Accidental Death: 192 दिवसांत 143 मृत्‍यू! गोव्यात नेमकं चाललंय काय? 45% बळी युवावर्गाचे

Goa: नोकरीचे आमिष देऊन आणले गोव्यात, केले लैंगिक शोषण; केनियाच्या पीडितेची सुटका; नुकसानभरपाई मंजूर

Goa Politics: 40 आमदारांत ‘मगो’ असेल की नाही, हे जनताच ठरवेल! ‘मगो’ समर्थकांचा हल्लाबोल; सरदेसाईंच्या विधानाचा निषेध

Margao Master Plan: मडगावचा ‘मास्टर प्लॅन’ काहींचे ‘निवृत्ती पॅकेज’! सरदेसाईंचा आरोप; लाेकांचा आराखडा बनवण्‍याचे आश्‍वासन

SCROLL FOR NEXT