KL Rahul X/BCCI
क्रीडा

SA vs IND: केएल राहुल द. आफ्रिकेला एकटा भिडला! सेंच्युरियनवर सेंच्युरी ठोकत केले 'हे' पराक्रम

KL Rahul: सेंच्युरियन कसोटीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताच्या केएल राहुलने शतक करत अनेक विक्रम नावावर केले आहेत

Pranali Kodre

South Africa vs India, 1st Test Match at Centurion, KL Rahul Century:

मंगळवारपासून (26 डिसेंबर) दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात सेंच्युरियनला कसोटी मालिकेतील पहिला सामना सुरु झाला आहे. या सामन्यात भारताचा यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुलने शतकी खेळी केली. यासह त्याने काही विक्रमही केले आहेत.

या सामन्यात भारताचा पहिला डाव 67.4 षटकात 245 धावांवर संपुष्टात आला. भारताकडून केएल  राहुलने 137 चेंडूत 101 धावांची खेळी केली. या खेळीत 14 चौकार आणि 4 षटकार मारले. हे राहुलचे कसोटी कारकिर्दीतील आठवे शतक ठरले.

तसेच दक्षिण आफ्रिकेतील दुसरे शतक ठरले आहे. विशेष म्हणजे राहुलने यापूर्वी 2021 मध्ये देखील सेंच्युरियनमध्येच कसोटी सामना खेळताना 123 धावांची शतकी खेळी केली होती. पण त्या सामन्यात तो केवळ फलंदाज म्हणून खेळत होता.

एकमेव फलंदाज

केएल राहुलने सेंच्युरियनवर दुसरे कसोटी शतक ठोकल्यामुळे त्याने कोणालाच आत्तापर्यंत न जमलेला विक्रम केला आहे. केएल राहुल सेंच्युरियनवर दोन कसोटी शतके करणारा पहिलाच दक्षिण आफ्रिकेबाहेरचा म्हणजेच परदेशी खेळाडू ठरला आहे.

तसेच राहुलच्या पूर्वी सेंच्युरियनवर भारताकडून सचिन तेंडुलकरने 2010 साली एक शतक केले होते. तसेच विराट कोहलीने 2018 साली सेंच्युरियनवर एक शतक केले होते.

सचिन-विराटच्या पंक्तीत सामील

केएल राहुल हा दक्षिण आफ्रिकेमध्ये दोन किंवा त्यापेक्षा अधिक शतके करणारा पाचवाच आशियाई फलंदाज आहे. यापूर्वी भारताता दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरने दक्षिण आफ्रिकेत 5 कसोटी शतके केली आहेत. तसेच अझर मेहमूद, थिलन थुसरा समराविरा आणि विराट कोहली या आशियाई फलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेत प्रत्येकी 2 शतके केली आहेत.

पंत-धोनीला टाकले मागे

दरम्यान, या सामन्यात केएल राहुल यष्टीरक्षक फलंदाज म्हणून खेळत असल्याने त्याने आणखी एक विक्रम केला आहे. तो भारताकडून दक्षिण आफ्रिकेत कसोटीमध्ये सर्वोच्च खेळी करणारा यष्टीरक्षक फलंदाज ठरला आहे. त्याने ऋषभ पंतच्या विक्रमाला मागे टाकले आहे.

पंतने जानेवारी 2022 मध्ये केपटाऊनला झालेल्या कसोटीत नाबाद 100 धावांची खेळी केली होती.

दक्षिण आफ्रिकेत कसोटीमध्ये सर्वोच्च खेळी करणाऱ्या भारतीय यष्टीरक्षक फलंदाजांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर एमएस धोनी आहे. त्याने 2010 साली सेंच्युरियनला झालेल्या सामन्यात 90 धावांची खेळी केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vice President Candidate: ठरलं! एनडीए’चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा

Goa Film Festival 2025: ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित, ‘जुझे’ ठरला सर्वाधिक पुरस्कार विजेता चित्रपट

'...नाहीतर देशाची माफी मागा’, राहुल गांधींच्या आरोपांवर मुख्य निवडणूक आयुक्तांचे थेट प्रत्युत्तर; दिली 7 दिवसांची मुदत

Viral Video: 'सापांचा राजा'! जगातील सर्वात लांब विषारी सापाचा व्हिडिओ व्हायरल, एका हल्ल्यात घेऊ शकतो हत्तीचाही जीव

Weekly Health Horoscope: आरोग्याच्या दृष्टीने आव्हानात्मक आठवडा! 'या' 5 राशींनी निष्काळजीपणा टाळावा

SCROLL FOR NEXT