Indian Cricket Team Dainik Gomantak
क्रीडा

IND vs WI: टीम इंडियाला मोठा धक्का, T20 मालिकेला मुकणार 'हे' दोन धुंरधर

वेस्ट इंडिजविरुद्धच्या (West Indies) टी-20 मालिकेपूर्वी भारतीय क्रिकेट संघाला दुहेरी धक्का बसला आहे. संघाचा उपकर्णधार केएल राहुल आणि अष्टपैलू अक्षर पटेल या मालिकेतून बाहेर झाले आहेत.

दैनिक गोमन्तक

वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेपूर्वी भारतीय क्रिकेट संघाला दुहेरी धक्का बसला आहे. संघाचा उपकर्णधार केएल राहुल आणि अष्टपैलू अक्षर पटेल या मालिकेतून बाहेर झाले आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने शुक्रवारी, 11 फेब्रुवारी रोजी एक निवेदन जारी करत सांगितले, दोन्ही खेळाडू तंदुरुस्तीच्या कारणांमुळे तीन सामन्यांच्या T20 मालिकेत खेळू शकणार नाहीत. ही मालिका 16 फेब्रुवारीपासून सुरु होणार असून सर्व सामने कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळवले जातील. राहुल (KL Rahul) नुकताच एकदिवसीय मालिकेचा भाग होता, परंतु तो फक्त दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दिसला होता. (KL Rahul Akshar Patel Will Miss The T20 Series Against The West Indies Due To Injury)

दरम्यान, भारतीय बोर्डाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, राहुलला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान दुखापत झाली होती, तर अक्षर पटेल (Akshar Patel) कोरोना संसर्गातून बरा होत आहे. बोर्डाने सांगितले की, "9 फेब्रुवारी रोजी दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात क्षेत्ररक्षण करताना, राहुलच्या डाव्या हाताला ताण आला होता, तर अक्षर पटेलने नुकत्याच झालेल्या कोरोना संसर्गातून बरे झाल्यानंतर त्याच्या पुनर्वसनाचा अंतिम टप्पा सुरु केला आहे. ते दोघेही आता त्यांच्या दुखापतीची ( Fitness) पुढील काळजी घेण्यासाठी बंगळुरुमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत जाणार आहेत.

या दोन खेळाडूंना स्थान मिळाले

यासोबतच बीसीसीआयने (BCCI) दोन्ही खेळाडूंच्या बदलीची घोषणा केली. बोर्डाने युवा सलामीवीर ऋतुराज गायकवाड (Rituraj Gaikwad) आणि मधल्या फळीतील फलंदाज-पार्ट टाईम ऑफ-स्पिनर दीपक हुडा (Deepak Hooda) यांचा संघात समावेश केला आहे. दोन्ही खेळाडू एकदिवसीय मालिकेचा भाग होते. एकदिवसीय मालिकेपूर्वी ऋतुराजलाही संसर्ग झाला होता, त्यामुळे तो एकही सामना खेळू शकला नाही. त्याच वेळी, दीपक हुडाने पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने दोन्ही एकदिवसीय सामन्यांमध्ये उपयुक्त खेळी करत एक विकेटही घेतली होती.

श्रीलंका मालिकेतून पुनरागमन अपेक्षित

राहुलने या एकदिवसीय मालिकेत फक्त एकच सामना खेळला. बहिणीच्या लग्नामुळे तो पहिला वनडे खेळू शकला नाही, तर दुसऱ्या वनडेत त्याने 49 धावांची इनिंग खेळली. दुखापतीमुळे तो तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातून बाहेर पडला. राहुल आणि अक्षर आता या महिन्याच्या अखेरीस श्रीलंकेविरुद्धच्या T20 मालिकेतपर्यंत परतणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

T20 मालिकेसाठी भारतीय संघ

रोहित शर्मा ( Captain), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, रवी बिश्नोई, युझवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, अवेश खान , हर्षल पटेल, ऋतुराज गायकवाड आणि दीपक हुडा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मनोज परबांच्या कार्यकर्त्यावर मंत्री नीलकंठ हळर्णकर धावून गेले; कोलवाळमध्ये आरजी आणि भाजप समर्थक आमने-सामने Watch Video

Harus Rauf Controversy: रौफला '6-0' आणि 'प्लेन क्रॅश'ची नक्कल भोवली! फायनलआधी 'ICC'नं केली कारवाई, भारताशी पंगा घेणं पडलं भारी

नवरात्र, वाघ, हिंदू आणि अभयारण्य! गोव्यात व्हिडिओवरुन वाद; सामाजिक कार्यकर्त्याला धमकी देणाऱ्या भाजप नेत्यावर अखेर गुन्हा

सा जुझे दी आरियाल पुन्हा चर्चेत; पंचायत समोरील संत जोसेफ यांच्या पुतळ्याची विटंबना करुन चोरी

'पाठीत खंजीर खुपसला पण काँग्रेससोबत एकत्र लढण्यास तयार'; आप नेते पालेकरांचे काँग्रेस नेत्यांना चर्चेचे आवाहन

SCROLL FOR NEXT