RFD League Dainik Gomantak
क्रीडा

RFD League मध्ये केरळा ब्लास्टर्स, जमशेदपूरची विजयी सलामी

केरळा ब्लास्टर्सने हैदराबाद एफसीला 2-0 अशा फरकाने, तर बाणावली येथे जमशेदपूर एफसीने मुंबई सिटी एफसीला 3-0 फरकाने सहजपणे हरविले.

Kishor Petkar

पणजी : केरळा ब्लास्टर्स व जमशेदपूर एफसीने शनिवारी रिलायन्स फाऊंडेशन डेव्हलपमेंट लीग फुटबॉल स्पर्धेत शानदार विजय नोंदविले. नागोवा येथील मैदानावर केरळा ब्लास्टर्सने हैदराबाद एफसीला 2-0 अशा फरकाने, तर बाणावली येथे जमशेदपूर एफसीने मुंबई सिटी एफसीला 3-0 फरकाने सहजपणे हरविले.

हैदराबादविरुद्ध (Hyderabad FC) केरळा ब्लास्टर्सला व्हिन्सी बार्रेटो याने 17व्या मिनिटास पहिला गोल केला, नंतर हैदराबादचा बचावपटू सिंगसन याने स्वयंगोल नोंदवून केरळा ब्लास्टर्सचे (Kerala Blasters) काम सोपे केले. या स्पर्धेसाठी केरळा ब्लास्टर्सने आयएसएल स्पर्धेत खेळलेल्या पाच जणांना संघात सामावून घेतले आहे. तो अनुभव संघासाठी निर्णायक ठरला.

पियुष ठाकुरी याने दोन गोल नोंदवून जमशेदपूरच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. मुंबई सिटीविरुद्ध जमशेदपूरच्या संघाने (Jamshedpur FC) पूर्ण वर्चस्व राखले. पियुष ठाकुरी याने 26व्या मिनिटास कैसन आग्लेना याच्या कॉर्नर फटक्यावर पहिला गोल केला. जमशेदपूरने उत्तरार्धातील खेळात आणखी दोन गोल केले. बदली खेळाडू मिती याने संघाची आघाडी वाढविल्यानंतर 89व्या मिनिटास पियुष याने वैयक्तिक दुसरा गोल नोंदवून संघाला गुणतक्त्यात अव्वल स्थान मिळवून दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT