Samar Dubhashi Dainik Gomantak
क्रीडा

Samar Dubhashi : यष्टिरक्षक समर दुभाषीची पुनरागमनाची वाट मोकळी

संभाव्य संघ : बाहेरगावच्या खेळाडूंना वगळले

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji : गोवा क्रिकेट असोसिएशनने (जीसीए) चांगला पायंडा पाडताना रणजी करंडक क्रिकेट संभाव्य संघ निवडीत बाहेरगावच्या क्रिकेटपटूंना वगळले आणि राज्यातील खेळाडूंवरच विश्वास दाखविला. त्याचवेळी २८ सदस्यीय संघात दोघे यष्टिरक्षक असल्यामुळे मागील चार मोसम दुर्लक्षित राहिलेल्या समर दुभाषीसाठी पुनरागमनाचीही वाट मोकळी केली.

जीसीए सचिव रोहन गावस देसाई यांनी आगामी २०२३-२४ रणजी करंडक, सीनियर स्पर्धा (एकदिवसीय व टी-२०) मोसमासाठी संभाव्य खेळाडूंची यादी जाहीर केली. संघात समर दुभाषी व २३ वर्षांखालील आदित्य सूर्यवंशी असे दोघेच यष्टिरक्षक आहेत.

अनुभवाचा विचार करता, यंदा २७ वर्षीय समर गोव्यासाठी रणजी करंडक, विजय हजारे करंडक एकदिवसीय आणि सय्यद मुश्ताक अली करंडक टी-२० स्पर्धेसाठी मुख्य यष्टिरक्षक असेल. 

सलग चार मोसम राखीव खेळाडूंत

समर दुभाषी २०१८-१९ मोसमात शेवटचा रणजी करंडक क्रिकेट सामना खेळला होता. गतमोसमात २०२२-२३ मध्ये तो टी-२० आणि एकदिवसीय स्पर्धेत प्रत्येकी एक सामना खेळला होता.

२०१९-२० मोसमात गुजरातचा स्मित पटेल, तर २०२०-२१ ते २०२२-२३ असे तीन मोसम मुंबईचा एकनाथ केरकर याने यष्टिरक्षण केल्यामुळे समरला सलग चार मोसम राखीव खेळाडूंत राहावे लागले.

सध्या फक्त एकच करारबद्ध पाहुणा

गोव्याकडून गतमोसमात मुंबईचे सिद्धेश लाड, एकनाथ केरकर व अर्जुन तेंडुलकर असे तीन पाहुणे खेळाडू खेळले होते, त्यापैकी सिद्धेश व एकनाथ यांना जीसीएने करारमुक्त केले असून सध्या डावखुरा वेगवान गोलंदाज अर्जुन हाच करारबद्ध खेळाडू आहे.

बीसीसीआय नियमानुसार आगामी मोसमासाठी आणखी दोघा पाहुण्या क्रिकेटपटूंना निवडणे जीसीएला शक्य आहे. मुंबईचे माजी क्रिकेटपटू विनोद राघवन यांची रणजी संघाचे मुख्य प्रशिक्षक, तर प्रशांत शेट्टी यांची साहाय्यक प्रशिक्षकपदी यापूर्वीच नियुक्ती करण्यात आली आहे.

गोव्याचा संभाव्य रणजी क्रिकेट संघ

सुमीरन आमोणकर, अमोघ देसाई, मंथन खुटकर, वैभव गोवेकर, प्रथमेश गावस, शिवम आमोणकर, ईशान गडेकर, दीपराज गावकर, स्नेहल कवठणकर, सुयश प्रभुदेसाई, कश्यप बखले, तुनीष सावकार, अमूल्य पांड्रेकर, दर्शन मिसाळ,

मोहित रेडकर, वेदांत नाईक, धीरज यादव, फेलिक्स आलेमाव, हेरंब परब, लक्षय गर्ग, ऋत्विक नाईक, समीत आर्यन मिश्रा, विजेश प्रभुदेसाई, जगदीश पाटील, शुभम तारी, समर दुभाषी, आदित्य सूर्यवंशी, शुभम देसाई.

सीनियर संघाची २०२३-२४ मधील मोहीम

  • टी-२० स्पर्धा १६ ऑक्टोबरपासून

  • एकदिवसीय स्पर्धा २३ नोव्हेंबरपासून

  • रणजी करंडक स्पर्धा ५ जानेवारीपासून

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"रागाच्या भरात दिली होती तक्रार", सख्ख्या बहिणीची साक्ष फिरली, विनयभंगाच्या आरोपातून संशयित भावाची निर्दोष मुक्तता

Goa Drug Case: गोव्यातील 'नाईट पार्टी' ठरली अखेरची! इंदूरच्या 21 वर्षीय तरुणाचा हणजूणमध्ये संशयास्पद मृत्यू; ड्रग्जचा ओव्हरडोस? तपास सुरु

खरी कुजबुज: लवकरच गोव्यात 'रिअल काँग्रेस पार्टी?'

Khelo India Tribal Games: गोवा एकूण चार पदकांसह अठराव्या क्रमांकावर; 'खेलो इंडिया आदिवासी' स्पर्धेत सुवर्ण, रौप्य व दोन ब्राँझपदके

FC Goa vs Bengaluru: एफसी गोवा संघाला आवश्यकता एकाग्रतेची, बंगळूर एफसीविरुद्ध शनिवारी फातोर्ड्यात लढत

SCROLL FOR NEXT