Goa Cricket  Dainik Gomantak
क्रीडा

क्रिकेट सामन्याच्या पहिल्या दिवशी कौशल, उदितने गोव्याला सावरले

द्विशतकी मजल तमिळनाडूविरुद्ध पहिल्या दिवसअखेर 6 बाद 222 धावा

दैनिक गोमन्तक

पणजी: गोव्याची स्थिती 4 बाद 61 अशी नाजूक असताना कर्णधार कौशल हट्टंगडीने कर्णधारास साजेशी फलंदाजी करताना उदित यादव याच्या साथीत संघाचा पहिला डाव सावरला. त्यामुळे कुचबिहार करंडक 19 वर्षांखालील क्रिकेट (Cricket) सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर गोव्याने 6 बाद 222 धावांची मजल मारली.

गुजरातमधील सूरत येथील लालभाई काँट्रेक्टर स्टेडियमवर सोमवारपासून एलिट क गटातील चार दिवसीय सामन्यास सुरवात झाली. समजूतदारपणे फलंदाजी केलेल्या कौशलचे शतक अवघ्या चार धावांनी हुकले. त्याने पाचव्या विकेटसाठी उदितसह 97 धावांची भागीदारी केली. त्यामुळे गोव्याला पहिल्या डावात झटपट गुंडाळणे तमिळनाडूस (Tamil Nadu) शक्य झाले नाही. दिवसअखेर उदित 53 धावांवर खेळत होता. कौशलने 128 चेंडूंचा सामना करताना 17 चौकार व एका षटकाराच्या मदतीने 96 धावा केल्या. उदितने 225 चेंडूंच्या मॅरेथॉन खेळीत दोन चौकार व तेवढेच षटकार मारले.

महाराष्ट्राकडून (Maharashtra) डाव व 64 धावांनी पराभूत झालेल्या गोव्याची फलंदाजी सोमवारी सकाळी पुन्हा एकदा कोसळली. वीर यादव (17), देवनकुमार चित्तम (7), इझान शेख (8) व सनथ नेवगी (1) या चार फलंदाजांना गोव्याने गमावले तेव्हा धावफलकावर फक्त 61 धावा होत्या. अशा परिस्थितीत कौशलला उदितने तोलामोलाची साथ दिली. गोव्याने उपाहारास खेळ थांबला तेव्हा 4 बाद 104 धावा केल्या होत्या. कौशल शतकापासून चार धावा दूर असताना चहापानापूर्वी बाद झाला. त्यानंतर उदितने शिवेंद्र भुजबळ (14 ) व दीप कसवणकर (नाबाद 18) यांच्या साथीत किल्ला लढवत संघाला दोनशे धावांच्या पार नेले.

संक्षिप्त धावफलक

गोवा, पहिला डाव: 90 षटकांत 6 बाद 222 (वीर यादव 17, देवनकुमार चित्तम 7, इझान शेख 8 , कौशल हट्टंगडी 96 , सनथ नेवगी 1 , उदित यादव नाबाद 53 , शिवेंद्र भुजबळ 14, दीप कसवणकर नाबाद 18, व्ही. पी. धिरन 1-64 , पी. विग्नेश 2-71, बी. आदित्य 2-42, आकाश देवकुमार 1-31)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND U19 vs PAK U19: टीम इंडियाच्या पराभवाचा खरा विलन कोण? कर्णधार आयुष म्हात्रेची 'ती' चूक भारताला पडली महागात!

IND U19 vs PAK U19: टीम इंडियाचे स्वप्न भंगले! पाकिस्ताने भारताला 191 धावांनी नमवत उंचावला विजयाचा 'चषक' VIDEO

VIDEO: बापरे! ट्रकखाली जाता जाता वाचला... तरुणांचा जीवघेणा थरार व्हायरल; सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी ओढले ताशेरे

'पर्यटनाला ओव्हर-रेग्युलेशनचा फटका!' फुकेटच्या तुलनेत गोव्यातील हॉटेल्स दुप्पट महाग; अमिताभ कांतांचे Tweet Viral

Viral Video: व्हिडिओ गेमसाठी 2 वर्षे स्वतःला खोलीत कोंडून घेतलं, दरवाजा उघडताच समोरचं दृश्य पाहून उडाला थरकाप; सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल!

SCROLL FOR NEXT